शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

तलाठ्यासह दोघांना लाच घेताना पकडल

By admin | Updated: January 14, 2015 00:34 IST

गव्हाण : सात-बारासाठी पाच हजार घेतले

सांगली/तासगाव : खरेदी दस्ताची नोंद घालून सात-बारा उतारा देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या गव्हाण (ता. तासगाव) येथील प्रभारी गावकामगार तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली. आज, मंगळवारी मणेराजुरी येथे कारवाई केली. लक्ष्मण वसंत थोरबोले (वय ५०, रा. भिलवडी, ता. पलूस) व अरुण मधुकर नलवडे (४३, तासगाव) अशी त्यांची नावे आहेत. थोरबोले हा तलाठी आहे.थोरबोले डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील तलाठी आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे गव्हाणच्या तलाठी पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे, तर अरुण नलवडे झिरो तलाठी म्हणून काम करीत होता. गव्हाणमधील तक्रारदारास खरेदी दस्ताची नोंद घालून सात-बारा उतारा हवा होता. यासाठी त्यांनी थोरबोले याची भेट घेतली. यासाठी थोरबोले याने पाच हजार रुपये मागितले, नलवडे याने लाचेची रक्कम दिल्याशिवाय उतारा देणार नाही, असे सांगितले. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने ‘आज, मंगळवार लाच देतो’, असे सांगितले होते. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. कामानिमित्त थोरबोले बाहेरगावी गेला होता. तो मणेराजुरी येथे असल्याचे समजताच तेथे सापळा लावला. थोरबोले व नलवडे सोबतच होते. दोघांनी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेताच पथकाने त्यांना पकडले. याप्रकरणी रात्री उशिरा तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)