शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांनी सुरू झालेल्या शिक्षक भरतीचा घोळ मिटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:09 IST

सांगली : राज्य शासनाने सात वर्षाने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केली. मात्र भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला दीड वर्ष झाले, ...

सांगली : राज्य शासनाने सात वर्षाने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केली. मात्र भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला दीड वर्ष झाले, तरी प्रक्रिया रेंगाळली आहे. याचिकांचे कारण शिक्षण विभागाकडून दिले जात असले तरी, पोर्टलचा हा खेळ केव्हा संपणार, असा सवाल करण्यात येत आहे.राज्यात शिक्षक भरतीसाठी २०१२ पासून बंदी असल्यामुळे बेरोजगार बी.एड्., डी.एड्. विद्यार्थ्यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष होता. आता भरतीची आॅनलाईन प्रक्रिया प्रथमच राबविली जात आहे. ती पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित झाले. त्यावर राज्यभरातून एक लाख २३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी १२ हजार शिक्षकांची भरती करण्यासाठी पोर्टलवर जाहिराती प्रसिध्द केल्या. उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणालीही तयार करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात प्रक्रिया केव्हा सुरू होणार, याचीच उमेदवारांना प्रतीक्षा आहे.राज्यातील १४ खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय १२४१ शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शविला आहे. यामुळे मुलाखत प्रक्रियेतून उमेदवारांची सुटका होण्यातील मार्ग सुरळीत झाला आहे. पवित्र प्रणालीद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार, पात्रतेनुसार निवडक शाळांची यादी पोर्टलवर पाहता येणार आहे. या यादीतील पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम उमेदवारांना नोंदविण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी मेरिटनुसार थेट शिक्षकांची निवड केली जाणार आहेत. मात्र खासगी शैक्षणिक संस्थांना उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शिक्षक निवड करण्याचे अधिकार दिले आहेत. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलाविण्याची नियमावलीही तयार केली आहे. मुलाखत व वर्गात शिकविण्याच्या प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग करण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र मुलाखत घेण्याची प्रक्रिया वेळकाढू आहे. शिवाय मुलाखत निवडीवरून पुन्हा शंका उपस्थित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी खासगी शैक्षणिक संस्थांना मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्याबाबत विनंती केली होती. संस्थांनी ही विनंती मान्य करून प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र प्रक्रिया प्रत्यक्षात लांबली आहे.आठवड्यात प्रणाली खुली होणारउमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार आहे. मात्र इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी २० टक्के राखीव जागा मिळाव्यात, बी.एड्. उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट रद्द करावी या विषयांवर औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. २० टक्के राखीव जागा विषयावरील याचिकेबाबत अंतरिम आदेश झाले आहेत. मात्र अंतिम आदेशानंतर स्पष्टता येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली होणार असल्याचे सांगण्यात आले.