शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग जोडणी, रेल्वेमार्गाच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:53 IST

तज्ज्ञ म्हणतात, अजून बरेच करावे लागेल सांगली : देशातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या राष्टÑीय महामार्गापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असलेला व ...

तज्ज्ञ म्हणतात, अजून बरेच करावे लागेलसांगली : देशातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या राष्टÑीय महामार्गापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असलेला व रेल्वेचे सक्षम जाळे असलेल्या सांगली मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा मात्र विकास होताना दिसत नाही. जिल्ह्यातील पाणी योजनांची आवर्तने सुरू झाली; मात्र अर्धवट कामांमुळे अडचणी अद्याप कायम आहेत.देशातील प्रमुख राष्टÑीय महामार्ग अर्थात पुणे-बंगळूरू मार्ग जिल्ह्यातून जात असला तरी, त्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी वापर करून घेण्यात अद्याप यश आले नाही. सांगलीपासून केवळ पन्नासभर किलोमीटरवर हा महत्त्वाचा मार्ग असतानाही मतदारसंघात एखादा देशपातळीवरील महत्त्वाचा उद्योग अथवा औद्योगिक संस्था आलेली नाही. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या जिल्ह्यातील तरूणांना नोकरीसाठी पुण्या-मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे. सध्या विजापूर-गुहागर व रत्नागिरी-नागपूर या राष्टÑीय महामार्गाचे गतीने काम चालू आहे. देशातील प्रमुख शहरापर्यंत सहजपणे जाणारी रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. त्याचाही फायदा करून घेण्यात राज्यकर्त्यांना अपयश येत आहे. ड्रायपोर्टच्या माध्यमातून पहिले पाऊल उचलले गेले असले तरी, त्याची प्रत्यक्षातील अंमलबजावणी व त्याचा मतदारसंघाच्या विकासाला मिळणारा हातभार बघावा लागणार आहे.मिरज रेल्वे जंक्शनच्या माध्यमातून जिल्ह्याला ‘विकासाचे जंक्शन’ बनविता येऊ शकते. यासाठी राज्यकर्त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. या सुविधांचा उपयोग केल्यास जिल्ह्यातील शेतीला औद्योगिक क्षेत्राला उभारी मिळण्यास वेळ लागणार नाही.आतापर्यंत काय झाले उपाय?1जिल्ह्यातून आतापर्यंत केवळ एकच राष्टÑीय महामार्ग जात होता, आता मात्र विजापूर-गुहागर व नागपूर-रत्नागिरी या महत्त्वाच्या राष्टÑीय महामार्गांचे काम सुरू आहे.2संपूर्ण देशाला सोयीचे ‘अ‍ॅक्सेस’ असलेली रेल्वे दळणवळणाची सुविधा जिल्ह्यात उपयोग असतानाही त्याचा उपयोग होत नव्हता. आता मात्र ड्रायपोर्टच्या माध्यमातून त्याचा वापर प्रथमच होणार आहे.3जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी तीन महत्त्वाच्या पाणी योजना असल्या तरी, त्याची कामे रखडली होती. सध्या या योजना पूर्णत्वास येत आहेत.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यात वेअर हाऊसचे जाळे खूपच कमकुवत आहे. पायाभूत सुविधांचा विचार करता, वेअर हाऊसेसची संख्या वाढणे गरजेचे आहे.2जिल्ह्यात रेल्वेचे जाळे असताना व त्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी पडून असताना त्या जागांचा माल ठेवण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यासाठी रेल्वेने काही मोबदला घ्यावा, पण यामुळे रस्त्यावरील ताण कमी होऊन त्याचा फायदाही होणार आहे.3वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रस्त्यांचा विकास, उद्योग वाढीसाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत.