शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

सांगली जिल्ह्याच्या स्पोर्टस् ट्रेन्डला बदलाची चाके

By admin | Updated: August 29, 2016 00:17 IST

खेळाडूंची आंतरराष्ट्रीय झेप : इनडोअर खेळांची चलती, आॅनलाईन माहितीचाही कौशल्यवृद्धीसाठी वापर

आदित्यराज घोरपडे, सांगली : आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्याची किमया सांगली जिल्ह्यातील जिगरबाज खेळाडूंनी केली आहे. जिल्ह्याचा स्पोर्टस् ट्रेन्ड बदलला असून, प्रशिक्षकांसह पालकांनीही खेळावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. खेळातील विविध कौशल्ये शिकण्यासाठी आता गुगल व यू-ट्यूबचीही मदत घेतली जात आहे. क्रीडापंढरी सांगलीने देशाला अनेक मातब्बर खेळाडू दिले. कुस्ती, कबड्डी, बुध्दिबळ, वेटलिफ्टिंग, अ‍ॅथलेटीक्स, जिम्नॅस्टिक, स्केटिंग, खो-खो आदी खेळांमध्ये जिल्ह्याने आपला दबदबा कायम ठेवला आहे. मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूंमागे प्रशिक्षकरूपी ‘गाईड’ खंबीरपणे उभे आहेत. खो-खोमध्ये युवराज जाधव, मिलिंद चावरेकर, नरेश सावंत या खेळाडूंनी दक्षिण आशियाई स्पर्धेपर्यंत धडक मारली. स्केटिंगमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक सूरज शिंदे यांच्या खेळाडूंनी सिंगापूर व थायलँड येथील स्पर्धा गाजवली. जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी थेट लिम्का व गिनीज बुकमध्ये ‘एन्ट्री’ केली आहे. सांगलीच्या जिम्नॅस्टिकला आता ‘अच्छे दिन’ आले आहेत. शांतिनिकेतन परिसरात राष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. गौतम पाटील यांच्या नेत्वृत्वाखाली डझनभर खेळ शांतिनिकेतनमध्ये सुरू आहेत. विशेषत: अश्वारोहण (अ‍ॅक्वेस्टेरीयम) खेळाने राज्याचं लक्ष शांतिनिकेतनकडे वेधले आहे. नितीन शिंदे, एस. एल. पाटील, प्रा. जहाँगीर तांबोळी, रवींद्र आरते, प्रा. संजय पाटील, डॉ. सुहास व्हटकर, बापू समलेवाले, रुक्साना मुलाणी, पूजा पाटील, माया खटके आदी क्रीडा संघटकांमुळे सांगली जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना मिळाली आहे. क्रीडा क्षेत्रातील घडामोडी रामकृष्ण चितळे, नाना सिंहासने, गौतम पाटील, रामभाऊ घोडके, मुन्ना कुरणे ही मंडळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. मनपाने स्वबळावर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याने चुरस वाढली आहे. विविध खासगी क्रीडा क्लासेसची संख्या वाढली असून, त्यामुळे दर्जेदार खेळाडू घडण्यास हातभार लागत आहे. शासनाने मान्यता दिलेल्या नवीन खेळांमुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे.