शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युवा नेत्यांचे सत्तेसाठी काय पण!

By admin | Updated: March 16, 2017 23:40 IST

घराणेशाहीचा नवा फंडा : जिल्हा परिषदेतून थेट पंचायत समितीमध्ये

अशोक पाटील ल्ल इस्लामपूरमहाराष्ट्रातील अनेक नेत्यांची राजकीय कारकीर्द गल्लीपासून दिल्लीपर्यंत झळाळती राहिली आहे. अलीकडे राजकारणात घराणेशाहीचा नवीन फंडा आला आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेते, घराणी दोन पायऱ्या खाली उतरत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक यांनी दोन पायऱ्या खाली उतरून पंचायत समिती सदस्यत्व स्वीकारले आहे.वाळवा तालुक्यात राजारामबापू पाटील यांनी सहकार, शिक्षण, वित्तीय संस्थांचे लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यांचा वारसा जपणारे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी तालुक्याबरोबरच राज्याच्या नेतृत्वाची धुरा पार पाडली आहे. या घराण्यातील कासेगावचे देवराज पाटील यांनी कमी वयातच सरपंच ते जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. काही घराण्यांना लागलेली सत्तेची चटक सहजासहजी सुटत नाही. हे वास्तव देवराज पाटील यांच्याबाबतही खरे ठरले आहे. त्यांचा जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांनी राजकीय प्रवाहात राहण्यासाठी पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि जिंकलीही.येलूर व पेठ जिल्हा परिषद मतदार संघावर नानासाहेब महाडिक गटाचे वर्चस्व कायम अबाधित राहिले आहे. २५ वर्षांहून अधिक काळ येलूर मतदार संघावर महाडिक यांच्या घरातील एक तरी सदस्य निवडून जातोच. मागीलवेळी येलूरमधून त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी महाडिक, तर पेठमधून पुत्र सम्राट महाडिक यांनी बाजी मारली होती. थोरले पुत्र राहुल महाडिक यांनी शैक्षणिक संस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. यंदा येलूर आणि पेठ मतदारसंघ आरक्षित झाल्याने महाडिक यांना पहिल्यांदाच सत्तेपासून दूर राहावे लागणार होते. परंतु अखेरच्या टप्प्यात राहुल महाडिक यांनी पंचायत समितीसाठी उमेदवारी भरली आणि निवडणूक जिंकली. यातून त्यांनी घराणेशाहीच टिकवून ठेवली. सत्तेच्या प्रवाहात राहणे आणि राजकीय घराणेशाही टिकविणे यासाठी वाट्टेल ते करण्यास सगळेच नेते मागे-पुढे बघत नाहीत, हेच खरे!