शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात नागपंचमीसाठी काय पण..!

By admin | Updated: October 19, 2016 19:00 IST

‘नागपंचमीसाठी काय पण...’ असा नारा देत जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी यासाठी शिराळकर सरसावले आहेत. फटाकेमुक्त दीपावली साजरी करून त्यातून वाचलेले

ऑनलाइन लोकमत
शिराळा, दि. 19 -  ‘नागपंचमीसाठी काय पण...’ असा नारा देत जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी यासाठी शिराळकर सरसावले आहेत. फटाकेमुक्त दीपावली साजरी करून त्यातून वाचलेले पैसे, वाढदिवस साजरा न करता त्याचे पैसे, दीपावलीतील किल्ला स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम नागपंचमी बचाव कृती समितीस न्यायालयीन लढ्यासाठी देण्याचे शिराळकरांनी मंगळवारी जाहीर केले. निवडणुकीवर बहिष्काराबरोबरच आता शासनाचे कर न देता असहकाराचे अस्त्र उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपंचमीबाबत बचाव कृती समितीमार्फत येथील मरिमी चौकात नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
मंगळवारी शिराळा बंद ठेवण्यात आले होते. रात्री कृती समितीमार्फत न्यायालयीन लढाईबाबतची प्रगती, निवडणूक बहिष्कार व पुढील आंदोलनाची दिशा याबाबत नागरिकांची बैठक घेण्यात आली. विनायक गायकवाड यांनी माहिती दिली. त्यानंतर अ‍ॅड. प्रदीप जोशी, अ‍ॅड. नरेंद्र सूर्यवंशी यांनी न्यायालयीन कामकाजाची माहिती दिली.
 पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. भगतसिंग नाईक म्हणाले की, निवडणूक बहिष्काराचा निर्णय योग्य आहे. आता शासनाचे शेतसारा आदी कर न भरण्याबाबतही निर्णय घ्यावा. त्यास सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला.
जि. प. सदस्या वैशाली नाईक, सुनंदा सोनटक्के, संगीता साळुंखे, रुपाली कदम, प्रतीक्षा निकम या महिलांनी, आपण सर्व महिलाही आंदोलनात उतरणार असल्याचे सांगितले.
अजय जाधव, सम्राट शिंदे, संभाजीराव नलवडे, भीमराव गायकवाड, माजी जि. प. ससदस्य महादेव कदम, जयसिंगराव शिंदे, प्रताप पाटील, बाबालाल मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केले. न्यायालयीन लढ्याबरोबरच कायद्यात बदल करण्याच्यादृष्टीने कायदे मंडळाकडे प्रस्ताव पाठवणे, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव पाठविणे आदी निर्णय घेण्यात आले.
रणजितसिंह नाईक, प्रमोद नाईक, अभिजित नाईक, केदार नलवडे, लालासाहेब शिंदे, संदीप पाटील, संतोष गायकवाड, विश्वास कदम, डी. जी. आत्तार, उत्तम निकम, गजानन सोनटक्के, देवेंद्र पाटील, वसंत कांबळे, संगीता खटावकर, सुनील कवठेकर, लालासाहेब तांबीट, प्रवीण शेटे उपस्थित होते.
 
-  बसवेश्वर शेटे, सत्यजित कदम यांनी वाढदिवस साजरा न करता अनुक्रमे १५ हजार व ११ हजार रुपये, तसेच केदार नलवडे यांनी ५१ हजार रुपये कृती समितीला देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
- दीपावलीत फटाके न उडविता त्याचे पैसे कृती समितीला देण्याचे ठरले. यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
- हिंदवी स्वराज्य गु्रपमार्फत दरवर्षी किल्ला स्पर्धा घेण्यात येते. यावर्षी त्यांनी स्पर्धा रद्द करुन, यातील बक्षिसाची रक्कम कृती समितीला देण्याचे जाहीर केले.
- अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांनी, आता फक्त ‘३२ शिराळा’ असे गावाचे नाव न लावता, प्रत्येकाने ‘नागपंचमीचे ३२ शिराळा’ असे नाव दुकानांच्या फलकांवर, व्हिजिटिंग कार्ड आदींवर लिहावे, असे सांगितले.
- निवडणूक बहिष्काराबरोबरच कोणताही शासकीय कर न भरता, असहकाराचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.