शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मल्टिस्टेट म्हणजे काय रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST

सहकाराच्या तत्त्वावर कृष्णा साखर कारखाना उभा राहिला. त्याच्या जोडीने सहकारी तत्त्वावर शेतीपूरक उद्योग उभे राहिले. या उद्योगांचे काय झाले, ...

सहकाराच्या तत्त्वावर कृष्णा साखर कारखाना उभा राहिला. त्याच्या जोडीने सहकारी तत्त्वावर शेतीपूरक उद्योग उभे राहिले. या उद्योगांचे काय झाले, याचा सातबारा प्रत्येक निवडणुकीत वाचला जातो. १९८९ पासून मोहिते आणि भाेसले बंधू सहकाराचा मुद्दा घेऊन लढत असतात. विरोधकांनी कारखाना कसा खाल्ला, याची उदाहरणे देतात. कारखाना सभासदांना विश्वासात घेऊनच चालवला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.

यंदा सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. सुरेश भाेसले सांगतात की, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, जयवंतराव भाेसले यांचा आदर्श घेऊन आपण निवडणुकीत उतरलो आहोत. हे सांगत असताना कारकिर्दीत सहकाराला बळकटी दिल्याची उदाहरणे ते देतात. उसाला सर्वाधिक दर, मोफत साखर, कारखान्याचे अत्याधुनिकीकरण, ऊस उत्पादनवाढीला चालना, अत्याधुनिक ऊसतोडणी यावर भर देऊन सभासदांना सहकाराचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उडवली आहे. कारखान्याचे खासगीकरण, कृष्णा मेडिकल ट्रस्टमधील भ्रष्टाचार, सहकार चळवळ मोडीत काढणे, राजकीय पक्ष सहकारात आणणे आदी आरोप घेऊन ते सभासदांपुढे जात आहेत.

संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते सहकार पॅनलच्या नेत्यांवर कारखाना खासगीकरणाकडे नेत असल्याची टीका करतात. यामध्ये खासगी जयवंत शुगरला झुकते माप आणि कृष्णेला दुय्यम स्थान, सभासदांना सहकारातून हाकलून देण्याचा डाव, अन्यायकारक ऊसतोड, खोट्या केसेसवर अनाठायी खर्च, मोफत साखेरचा दिखाऊपणा यावर ते बोट ठेवत आहेत. संस्थापक पॅनलने आरोग्य उपचार सुविधा अंमलात आणणार असल्याचा नवीन मुद्दा चर्चेत आणला आहे.

तिन्ही पॅनलचे प्रमुख सहकाराचा मुद्दा पुढे करत प्रचाराला लागले असले तरी मल्टिस्टेटच्या नावाखाली सहकाराचे खासगीकरण करण्याचे डाव सुरू असण्यावर कडाडून आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

- अशोक पाटील, इस्लामपूर