शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

पश्चिम बंगालचा चोरटा पुण्यातून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:40 IST

सिंगल फोटो १५१२२०२० तरुण मोदी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या पश्चिम ...

सिंगल फोटो १५१२२०२० तरुण मोदी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या पश्चिम बंगाल येथील गलाई कारागिराला मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका रात्रीत गुन्ह्याचा छडा लागला. तरुण दयाल मोदी (वय २०, रा. शीतलपूर, पश्चिम मिदनापूर, ता. घाटाल, पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत अनिल जाना (‌वय ३६, रा. गावभाग, खिलारे वाडा, सांगली, मूळ रा. किस्मत, ता. घाटाल) यांनी फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत जाना यांचे सांगलीत सराफी दुकान आहे. या दुकानात तरुण मोदी हा कारागीर म्हणून वर्षभरापासून काम करत होता. जाना यांनी त्याच्याकडे १०२ ग्रॅम सोने दिले होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हे सोने घेऊन तरुण मोदी हा पसार झाला. त्याचा दूरध्वनीही बंद होता. जाना यांनी तातडीने शहर पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक नीलेश बागाव, दिलीप जाधव, संदीप पाटील, विक्रम खोत, अक्षय कांबळे यांना संशयिताचा शोध घेण्याचे आदेश दिले.

पोलीस पथकाने त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन शोधले असता, ते सांगली रेल्वे स्थानकावर दाखवत होते. पथकाने सांगली रेल्वे स्थानकावर धाव घेतली. रात्री अकरा वाजण्याच्यासुमारास गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस सुटल्याची माहिती मिळाली. याच रेल्वेने संशयिताने पलायन केले असावे, असा अंदाज घेत पथकाने पुणे, अहमदनगर, दौंड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून चोरट्याची माहिती दिली. पहाटे साडेचारच्यासुमारास रेल्वे पुणे स्थानकावर आल्यानंतर आरसीएफचे निरीक्षक अश्वनीकुमार, फौजदार रेड्डी, कवडे यांनी चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. सकाळी नऊ वाजता सांगली पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच तासांत चोरटा जेरबंद झाला.

चौकट

दिल्लीला जाणार होता चोरटा

सोने चोरीतील संशयिताला पुणे रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. तो रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूममध्ये बसला होता. त्याच्याकडे दिल्लीचे तिकीट मिळून आले. यापूर्वी त्याने आणखी कुठे गुन्हा केला आहे का? याचा शोध पोलीस घेत असल्याचे निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.