शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सुसज्ज बसस्थानक करणार

By admin | Updated: November 20, 2015 00:20 IST

बाबासाहेब मुळीक : राज्यात १२ ठिकाणी प्रकल्प; एप्रिलमध्ये सुरुवात

सांगली : एसटी महामंडळाच्या राज्यातील महत्त्वाच्या जागांवर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज बस स्थानके, यात्री निवास, सभागृह, कार्यालय, स्वच्छतागृह, तसेच चित्रपटगृहाची उभारणी केली जाणार आहे. अहमदाबाद येथील बस पोर्टच्या धर्तीवर राज्यातील १२ बस स्थानकांची उभारणी केली जाणार आहे. त्यामध्ये सांगलीचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे संचालक बाबासाहेब मुळीक यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.ते पुढे म्हणाले की, सांगलीचे मध्यवर्ती एसटी स्टॅन्ड १९६३ पासून अस्तित्वात आहे. सहा एकरामध्ये ही जागा असून, यामध्ये शहरी आणि लांब पल्ल्याच्या एसटींची वाहतूक येथून होते. याशिवाय कार्यशाळा, एसटी बॅँकेसह विविध कार्यालये या जागेमध्ये आहेत. परिवहन मंत्री रावते यांच्याशी बस पोर्टबाबत बैठक झाली असून, त्यामध्ये महामंडळाच्या राज्यातील महत्त्वाच्या व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांवर अशी अत्याधुनिक बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बसस्थानक, यात्री निवास, सभागृह, कार्यालये, स्वच्छतागृह, चित्रपटगृह आदींचा समावेश आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्प व्यवस्थापकांची नेमणूक केली आहे. हा सर्व खर्च महामंडळाकडून करण्यात येणार असून, जानेवारी २०१६ च्या बजेटमध्ये तरतूद केली आहे. राज्यातील १२ ठिकाणांची निवड केली आहे. शासनाकडून महामंडळास १८०० कोटी रुपये दोन टप्प्यात मिळणार आहेत. पनवेल बोरिवली-नॅन्सी कॉलनी, शिवाजीनगर पुणे, सांगली-माधवनगर, सोलापूर, पुणे नाका, कोल्हापूर-संभाजीनगर, नाशिक महामार्ग, धुळे-मध्यवर्ती, जळगाव, औरंगाबाद-मध्यवर्ती, नांदेड-मध्यवर्ती, अकोला, नागपूर याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. दोनमजली इमारत उभी करण्यात येणार आहे. खालच्या मजल्यावर एसटीसाठी जागा तसेच वरील मजल्यावर विविध प्रकारची एसटी कार्यालये उभारण्यात येणार आहेत. बस पोर्टसाठी सांगलीची निवड करण्यात आल्यामुळे, १९६३ पासून अस्तित्वात असलेले सध्याचे मध्यवर्ती बस स्थानक इतिहासजमा होणार आहे. याबाबत ३० जूनरोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बैठक झाली असून, याची येत्या एप्रिल महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संचालक बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार येत्या ३१ मार्चला संपणार आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबतची मागणी महामंडळाकडे केली जाणार आहे. एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांची मान्यता मिळावी, याबाबतची मागणी केली असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष बिराज साळुंखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)माधवनगरसाठी दोन कोटींची मागणीमाधवनगरमध्ये बस स्थानकासाठी एसटीची दहा एकर जागा आहे. येथे दहा ते बारा फलाटांचे बसस्थानक, डेपो उभारला जाणार आहे. यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यासाठी अरुण हळिंगळे, दिलीप शहा, बाळासाहेब काळे आदींनी व माधवनगर एसटी स्टॅन्ड व डेपो कृती समितीने मागणी केली आहे. राज्यातील एसटी महामंडळाच्या महत्त्वाच्या जागांवर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज बसस्थानके, यात्री निवास, सभागृह, कार्यालय, स्वच्छतागृह, चित्रपटगृहाची उभारणी केली जाणार आहे. अहमदाबाद येथील बसपोर्टच्या धर्तीवर राज्यातील बस स्थानकांची उभारणी केली जाणार आहे.