शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत संघाच्या दसरा संचलनाचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:30 IST

मिरजेत दसºयानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचे मीरासाहेब दर्गा चौकात मुस्लिम बांधवांतर्फे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मिरजेत सुमारे ८० वर्षे संघाची संचलनाची परंपरा आहे. मात्र यावर्षी प्रथमच मुस्लिमबहुल वसाहतीत संचलनाचे मुस्लिमांकडून स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देमिरजेत सुमारे ८० वर्षे संघाची संचलनाची परंपरा मुस्लिमबहुल वसाहतीत संचलनाचे मुस्लिमांकडून प्रथमच स्वागत मीरासाहेब दर्गा चौकात मुस्लिम बांधवांतर्फे संचलनाच्या स्वागताची तयारी

मिरज : मिरजेत दसºयानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचे मीरासाहेब दर्गा चौकात मुस्लिम बांधवांतर्फे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मिरजेत सुमारे ८० वर्षे संघाची संचलनाची परंपरा आहे. मात्र यावर्षी प्रथमच मुस्लिमबहुल वसाहतीत संचलनाचे मुस्लिमांकडून स्वागत करण्यात आले.

मिरजेत १९३७ पासून संघाचे स्वयंसेवक दसºयानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करतात. दरवर्षी वेगवेगळ्या मार्गावरून संचलन करण्यात येते. शनिवारी मिरज हायस्कूल मैदानावरून सुरू झालेले संचलन मीरासाहेब दर्गा चौकातून जाणार असल्याने दर्गा चौकात मुस्लिम बांधवांतर्फे संचलनाच्या स्वागताची तयारी करण्यात आली.

असगर शरीकमसलत, जानिब मुश्रीफ, मेहेबूब मणेर, जावेद मुश्रीफ, नसिर सय्यद, फैय्याज पठाण, रफिक मुतवल्ली,शमशुद्दीन मुतवल्ली, सईद मुतवल्ली, अल्ताफ मुश्रीफ यांनी संघ स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत केले. संघाच्या संचलनाचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत होण्याची ही पहिलीच घटना आहे.

संचलनाच्या स्वागतासाठी पुढाकार घेणारे असगर शरीकमसलत यांनी समाजात चांगला संदेश जावा, यासाठी संचलनाचे स्वागत केले. संघाचे विचार काहीही असले तरी, सामाजिक सलोखा व एकतेसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह नितीन देशमाने म्हणाले, संघ नि:स्वार्थीपणे, देशहितासाठी काम करीत असल्याचे व संघाची व्यापक हिंदुत्वाची व्याख्या लक्षात आल्याने संघाकडे धार्मिक दृष्टीने पाहणाºयांचे गैरसमज दूर झाले आहेत. यामुळे मुस्लिम बांधवांनी संचलनाचे स्वागत केले असल्याचे त्यांनी सांगितले. दसरा व हेडगेवार जयंतीला संघाचे संचलन होते; मात्र यापूर्वी मिरजेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचलन केले होते. संचलनात सुमारे पाचशे संघ स्वयंसेवक सहभागी होतात. यावर्षी लहान मुलांनी स्वतंत्र संचलन केले.