शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तिरंगा यात्रेचे स्वागत

By admin | Updated: August 26, 2016 23:15 IST

खासदार, आमदारांचा सहभाग : ‘याद करो कुर्बानी’अंतर्गत आयोजन

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘याद करो कुर्बानी’ या कार्यक्रमांतर्गत खासदार संजयकाका पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सांगलीत तिरंगा यात्रा मोटारसायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.वखार भाग, गणपती मंदिर, टिळक चौकमार्गे तिरंगा यात्रा सांगलीवाडीत आली. तेथून मारुती चौक, बसस्थानक, शास्त्री चौकातून हरिपूर येथे यात्रा आली. तेथेही नागरिकांनी जोरदार स्वागत केले. मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खा. पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदेमातरम्’च्या घोषणाही कार्यकर्ते देत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असून जनतेचे प्रश्न जाणून घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, भारती दिगडे, मुन्ना कुरणे, युवराज बावडेकर, स्वरदा केळकर, शिवाजी डोंगरे,अरविंद ताबवेकर, भालचंद्र पाटील, प्रकाश बिरजे, माजी महापौर सुरेश पाटील, सुब्राव मद्रासी, सुभाष बुवा, दरीबा बंडगर, दीपक माने, धनेश कातगडे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)मिरजेत यात्रेस प्रतिसादमिरज : मिरजेत खा. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेत तिरंगा ध्वजासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. भारतनगर येथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला. बसवेश्वर पुतळा, शिवाजी पुतळा, सावरकर पुतळा, आंबेडकर पुतळा व गांधी पुतळा व शास्त्री पुतळ्यास खा. संजय पाटील यांनी अभिवादन केले. शिवाजी चौक, शनिवार पेठ, दत्त चौक, किसान चौक, शास्त्री चौक मार्गे गांधी पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप झाला. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवान व क्रांतिकारकांच्या स्मृतीसाठी तिरंगा यात्रा काढण्यात आल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. यावेळी मकरंद देशपांडे, ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे, सचिन चौगुले, रोहित चिवटे, शरद जाधव, तानाजी घरगे, धनपाल खोत, सलीम मुश्रिफ, पांडुरंग कोरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.