शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वेबसाईट हॅक करुन माधवनगरच्या व्यापाऱ्यास पावणेचार लाखांचा गंडा

By admin | Updated: April 9, 2017 12:38 IST

एकाविरुद्ध गुन्हा : कंपनीचीही फसवणूक केल्याचे निष्पन्न

आॅनलाईन लोकमतसांगली : मुंबईतील एका कंपनीची वेबसाईट (संकेतस्थळ) हॅक करुन माधवनगर (ता. मिरज) येथील मुकुंद मदनगोपाल मालू (वय ३३) या व्यापाऱ्यास तीन लाख ७८ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी राजेश गुप्ता याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याने कंपनीचीही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.मुकुंद मालू गुरुवार पेठेतील आरोग्य केंद्राजवळ राहतात. त्यांचा बॅग तयार करण्याचा कारखाना आहे. बॅगेसाठी लागणारा कच्चा माल ते मुंबईतील एका कंपनीकडून मागवून घेतात. दोन दिवसापूर्वी त्यांनी तीन लाख ७८ हजार रुपयांचा माल मागवला होता. याचे बिल त्यांनी आॅनलाईन करतो, असे कंपनीला सांगितले होते. त्यानंतर त्यांनी बिल भागविण्यासाठी कंपनीला त्यांचा बँक खात्याचा क्रमांक स्वत:च्या मेल आयडीवर टाकण्यास सांगितले होते. शुक्रवारी मालू यांच्या मेल आयडीवर कंपनीच्या नावाने एक मेल आला. त्यामध्ये बँक खात्याचा क्रमांक होता. मालू माधवनगरच्या तामिळनाडू मर्चंट बँकेत गेले. तिथे त्यांनी स्वत:च्या खात्यावरुन तीन लाख ७८ हजाराची रोकड आॅनलाईन कंपनीच्या बँक खात्यावर हस्तांतरित केली. रोकड हस्तांतरित झाल्याचा मालू यांच्या मोबाईलवर संदेश आला. मालू यांनी कंपनीशी संपर्क साधून बिलाची रक्कम तुमच्या बँक खात्यावर हस्तांतरित झाल्याचे सांगितले. पण कंपनीने त्यांना अजून आम्ही आमच्या कंपनीचा बँक खात्याचा क्रमांक दिला नाही, रक्कम कशी हस्तांतरित केली? अशी विचारणा केली. त्यावेळी मालू यांनी त्यांच्या मेल आयडीवर कंपनीच्या नावाने जो बँक खाते क्रमांक आला होता, तो सांगितला. यावर कंपनीने हा आमचा खाते क्रमांक नाही, असे सांगितले. त्यानंतर कंपनीने तसेच मालू यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर राजेश गुप्ता नामक व्यक्तीने मुंबईतील कंपनीची वेबसाईट हॅक करुन कंपनीच्या नावाने स्वत:चा बँक खाते क्रमांक दिल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मालू यांनी शनिवारी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)पहिल्यांदाच प्रकारबँकेतून बोलत आहे, असे सांगून एटीएमचा पिन क्रमांक विचारुन खात्यावरुन रोकड काढण्याचे गुन्हे शहरात सातत्याने घडत आहेत. पण कंपनीची वेबसाईट हॅक करुन आॅनलाईन बँकिगद्वारे गंडा घातल्याचा प्रकार सांगलीत पहिल्यांदाच घडल आहे. हा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईला जाणार आहे.?