शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

नाले, पूरपट्ट्यातील बांधकामांवर कारवाई करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST

सांगली : आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमास शासन प्राधान्य देत आहे. त्यामुळे नैसर्गिक नाले, पूरपट्ट्यातील बांधकामे यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत. ...

सांगली : आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमास शासन प्राधान्य देत आहे. त्यामुळे नैसर्गिक नाले, पूरपट्ट्यातील बांधकामे यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत. संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, असा इशारा नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

शिंदे म्हणाले की, यापूूर्वी झालेल्या पूरपट्ट्यातील बांधकामांबाबत काही विचार करण्यापेक्षा यापुढे अशी कोणतीही बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. अशी बांधकामे करणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्याचे आदेश मी प्रशासनाला देत आहे. त्यासाठीच संयुक्त बांधकाम नियंत्रण नियमावली, पावसाळी पाण्याचा निचरा असे कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

आरक्षित जागांवरील, अतिविद्युतभारीत तारांखालील गुंठेवारी नियमित करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर प्रशासन घेणार आहे. गुंठेवारी नियमितीकरणाचा हा अंतिम आदेश आहे. यापुढील कोणतीही गुंठेवारी नियमित केली जाणार नाही. शासन त्याबाबत ठाम आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनानेही त्याची काळजी घ्यावी. लोकांची मागणी होती, अडचणी होत्या म्हणून हा निर्णय घेतला आहे.

नगरपालिका, महापालिकांनी आता त्यांच्या पातळीवरही लोक सहभागातून काही योजना राबवाव्यात. प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून राहणे कमी करावे. शासनाला सध्या निधी खर्च करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही शासन शक्य तेवढी मदत करेल. करांची वसुली करून त्यातूनही चांगली कामे करावीत, असे ते म्हणाले.

चौकट

उपयोगकर्ता कर राहणारच

स्थानिक पातळीवर उपयोगकर्ता करासह अन्य कर कायम राहतील. ते लोकांच्या विकासाकरिताच आकारले जात आहेत. त्यामुळे त्यात सवलत किंवा ते रद्द करण्याचा कोणताही विचार शासन करणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. घरपट्टीपेक्षा उपयोगकर्ता कर अधिक असल्याबाबत प्रधान सचिव महेश पाठक यांनी कदाचित सांगलीची घरपट्टी कमी असेल, असे सांगितले.

चौकट

कोरोनामुळे सर्वच विभागांना झटका

कोरोनामुळे सर्वच विभागांचा निधी कमी झाला आहे. तरीही शासन विकासकामे करताना निधीची कमतरता भासू देणार नाही. अन्य उत्पन्नाचे स्रोतही शोधले जातील, असे मंत्री शिंदे म्हणाले.