शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कामेरी परिसरातील दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST

कामेरी : कामेरी परिसरातील दिव्यांग बांधवांना कृषिभूषण जगदीश पाटील आप्पा दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ...

कामेरी : कामेरी परिसरातील दिव्यांग बांधवांना कृषिभूषण जगदीश पाटील आप्पा दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करू व त्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी केले.

कामेरी (ता. वाळवा) येथे कृषिभूषण जगदीश पाटील आप्पा दिव्यांग पुनर्वसन, सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जागतिक अपंग दिनानिमित्त लोकनेते राजारामबापू पाटील मल्टिपर्पज डेव्हलपमेंट सोसायटी संलग्न दिव्यांग पुनर्वसन, सल्ला व मार्गदर्शन केंद्राची कामेरी येथे स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमास संग्राम जगदीश पाटील, जयंत दारिद्र्य निर्मूलनचे समन्वयक इलियास पिरजादे, संजय कटारे, ग्रामपंचायत सदस्य इम्रान संदे, शब्बीर मुल्ला उपस्थित होते.

यावेळी नूतन केंद्राचे अध्यक्ष दिनकर भोसले, उपाध्यक्ष सागर फोंडे, सचिव अस्लम संदे, खजिनदार जालिंदर सावंत व सदस्य अनिकेत पाटील, वसंत पाटील, वसंत माने, अफझल पिरजादे, सुधीर पेठकर, मनीषा माने, सविता फोंडे या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मारुती पाटील यांनी स्वागत केले. किरण खोत यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर भोसले यांनी आभार मानले.

फोटो : ०४ कामेरी १

ओळी : कामेरी (ता. वाळवा) येथे कृषिभूषण जगदीश पाटील यांना रणजित पाटील, संग्राम पाटील, दिनकर भोसले, सागर फोंडे, अस्लम संदे यांनी अभिवादन केले.