शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांसाठी आम्ही दोघे एकत्रच

By admin | Updated: September 23, 2016 23:39 IST

संजयकाका, पृथ्वीराज देशमुखांची ग्वाही : भिलवडीत विविध कामांचे उद्घाटन

भिलवडी : विकास कामांसाठी आम्ही दोघे सदैव एकत्रितच असून, भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात आम्ही कमी पडणार नसल्याची ग्वाही खासदार संजय (काका) पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी दिली. भिलवडी (ता. पलूस) येथे आयोजित विविध विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी या दोघांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. भिलवडीतील चौगुले प्लॉटअंतर्गत रस्ते, महावीरनगर रस्ता दुरूस्ती, भुवनेश्वरवाडी येथील भैरवनाथ मंदिर सभामंडप व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामांचा प्रारंभ संजय पाटील व पृथ्वीराज देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. भुवनेश्वरी मंदिरात काका आणि बाबा एकत्रित भुवनेश्वरीदेवीचे दर्शन घेत असताना, भिलवडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी, ‘आई अंबाबाई, या दोघांना सदैव एकत्रित ठेव गं आई’, असे उद्गार काढले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आम्ही दोघे एकत्रितच असून भूतकाळातल्या गोष्टी इतिहासजमा झाल्या असल्याचे पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले. आता आम्ही दोघांनीही जिल्हा परिषद व पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आणण्याचा ध्यास घेतला असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले. यावेळी भाजपचे पलूस तालुकाध्यक्ष विजय पाटील, पं. स. सभापती विजय कांबळे, भिलवडीचे सुरेंद्र वाळवेकर, मन्सूर मुल्ला, रमेश पाटील, धनंजय पाटील, तानाजी भोई, विजय पाटील, श्रीकांत निकम, महावीर नवले, मुन्ना पठाण, श्रीकांत सरडे, सरपंच जनार्दन साळुंखे, गजानन मोहिते, सुनील कुलकर्णी, दीपक मगदूम, प्रा. महेश पाटील, चंद्रकांत केंगार आदी उपस्थित होते.(वार्ताहर)