शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्या नेतृत्त्वाचा आम्हाला अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST

शिराळा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासारखे बहुआयामी नेतृत्व देशाला लाभले. विशेष म्हणजे ते महाराष्ट्राच्या मातीतील आहे, ...

शिराळा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासारखे बहुआयामी नेतृत्व देशाला लाभले. विशेष म्हणजे ते महाराष्ट्राच्या मातीतील आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

शिराळा येथे खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘वर्चुअल रॅलीचे’ आयोजन केले होते. यावेळी आमदार नाईक बोलत होते.

ते म्हणाले, शरद पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत. वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांच्या कामाचा आवाका युवकांना लाजवेल असा आहे. राज्याच्या, देशाच्या राजकारणातले अनेक चढ-उतार त्यांनी जवळून अनुभवले आहेत. एका सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन झालेला राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. सर्वसामान्य, शेतकरी, जनतेशी त्यांची नाळ कायम आहे. अनेक वादळे येऊनही ते डगमगले नाहीत. त्यामुळे वादळांना अनेकवेळा मार्ग बदलायला लावणाऱ्या आमच्या नेत्याचा आम्हा कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान वाटतो.

तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी स्वागत केले. यावेळी ‘विश्वास’चे संचालक दिनकरराव पाटील, मानसिंग पाटील, विश्वास कदम, सुरेश पाटील, विष्णू पाटील, बिरुदेव आंबरे, विश्वास पाटील, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, उपसभापती बी. के. नायकवडी, पंचायत समितीचे सदस्य मनीषा गुरव, प्रकाश धस, नगराध्यक्ष सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, रूपाली भोसले, राहुल पवार आदी उपस्थित होते. पौर्णिमा पवार यांनी आभार मानले.

फोटो-१२शिराळा०१

फोटो ओळी : शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.