शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत तांबट व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:00 IST

सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : एकेकाळी शेकडो कारागीर असलेल्या मिरजेत आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच तांब्या, पितळेची ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : एकेकाळी शेकडो कारागीर असलेल्या मिरजेत आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच तांब्या, पितळेची भांडी घडविणारे तांबट या नावाने ओळखले जाणारे कारागीर शिल्लक राहिले आहेत. महागाईमुळे स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर वाढल्याने तांबट बेरोजगार झाले आहेत. तांबा-पितळेच्या भांड्यांची क्रेझ पुन्हा वाढत असताना तांबट व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे.मिरजेत कमानवेस परिसरात तांबट मंडळींचा भांडी ठोकण्याचा आवाज सर्वांनाचा परिचयाचा होता. तांबा, पितळ व अ‍ॅल्युमिनियमची भांडी हाताने ठोकून कारागीर घडवित असत. ऐरणीवर पातेले, घागर, हंडा यासह मोठ्या आकाराची भांडी ठोकून चमकविण्यात येतात. भांड्यावर घणाचे, हातोडीचे घाव घालून भांडे घडविण्याचे काम खरोखर कष्टाचे आहे. कारखान्यातून तयार केलेली भांडी घडविण्यासाठी कारागीरांकडे येतात.तांबा व पितळ हे धातू स्वस्त असताना मिरजेतील कारागीरांचा व्यवसाय जोमात होता; मात्र गेल्या दशकात तांबा व पितळेची किंमत वाढल्याने पातेले, घागर, हंडा अशा भांड्यांची मागणी कमी झाली. स्टील व प्लास्टिकच्या स्वस्त भांड्यांचा वापर वाढल्याने तांबट कारागीरांच्या व्यवसायावर संक्रांत आली आहे.तांबा व पितळ या धातूची किंमत प्रतिकिलो सहाशे रुपयांवर गेली आहे. यामुळे दोन हजार ते दहा हजार रुपये किमतीची तांबा, पितळेची भांडी परवडत नसल्याने, स्टीलच्या स्वस्त भांड्यांचा, अ‍ॅल्युमिनिअमच्या मोठ्या भांड्यांचा वापर होत आहे. गरीब कुटुंबांमध्ये प्लास्टिक घागरींचा वापर होतो. त्यामुळे काम अत्यल्प उरल्याने तांबट कारागीरांचा व्यवसाय संपला आहे. मिरजेतील कमानवेस परिसरात आता केवळ चारच कारागीर शिल्लक आहेत. तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई करणारा तर मिरजेत एकच कारागीर आहे.बेरोजगार झालेले अनेक कारागीर औद्योगिक वसाहतीत कामाला जात आहेत. कारागीरांची मुलेही परंपरागत व्यवसायाऐवजी अन्य व्यवसाय करीत आहेत. सुमारे ३० ते ४० वर्षे तांबट काम करणारे कारागीर आजही हलाकीत जगत आहेत. तांबट कारागीरांना शासनाकडून मदतीची अपेक्षा कारागीर फिरोज बैरागदार व महंमदहनिफ पठाण यांनी व्यक्त केली.तक्रारीमुळेही अडचणी!चहाच्या दुकानात पितळेच्या भांड्यांचा वापर सुरू झाल्याने पुन्हा तांबा-पितळेच्या भांड्यांची क्रेझ निर्माण होत आहे. मात्र तांबा, पितळेची भांडी घडविणारे कारखाने व कारागीर मोठ्याप्रमाणात असलेल्या कर्नाटकातील नसलापूर या गावातून भांडी तयार होऊ लागल्याने स्थानिक कारागीरांच्या हाताला काम उरलेले नाही. भांडी ठोकण्याच्या आवाजाबद्दल होणाऱ्या तक्रारींमुळेही हा व्यवसाय अडचणीत आला आहे.