शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राष्ट्रवादी संपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: February 19, 2017 23:15 IST

पतंगराव कदम : अनेक तालुक्यांमधील अस्तित्व संपले

सांगली : आटपाडी, पलूस, कडेगाव, खानापूर अशा अनेक तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी अस्तित्वशून्य बनली आहे. त्यांचा पक्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका आ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, तडजोडीच्या राजकारणाने राष्ट्रवादीचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही अनेक ठिकाणी सोयीच्या आघाड्या त्यांनी केल्या. भाजप व शिवसेनेसोबत आघाडी न करण्याची भूमिका कॉँग्रेससह राष्ट्रवादीनेही स्वीकारली होती. तरीही बऱ्याच तालुक्यात त्यांनी भाजपबरोबर आघाडी केल्याचे दिसत आहे. पक्षाच्या चिन्हावर सर्वाधिक जागा सध्या कॉँग्रेसमार्फत लढविल्या जात आहेत. अन्य पक्षांची स्थिती याउलट आहे. या आघाड्यांचे नेमके काय होणार, याचे उत्तर निकालादिवशी मिळणारच आहे. त्याशिवाय नोटाबंदी आणि भाजप सरकारविरोधात लोकांमध्ये काय भावना आहे, त्याचीही चाचणी या निवडणुकीतून होणार आहे. राष्ट्रवादीने घेतलेले सर्व निर्णय स्थानिक पातळीवरच झाले आहेत. पलूस, कडेगाव येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकही सदस्य निवडून आला नाही. जयंत पाटील यांच्याशिवाय आता निर्णय घेणारा नेता राष्ट्रवादीत दुसरा कोणीही नाही. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा स्थानिक पातळीवरील निर्णयाशी काहीही संबंध नाही. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला यश मिळेल. सत्तेपर्यंत आम्ही निश्चित जाऊ. जिल्ह्यात सर्वत्र आम्ही प्रचार केला आहे. त्याठिकाणी लोकांचा प्रतिसाद पाहूनच या गोष्टीचा अंदाज आम्हाला आला आहे. भाजपच्या पदरात काय पडणार आहे, हे निकालादिवशी सर्वांना कळेल. लोकांमध्ये भाजपच्या निर्णयांबद्दल सुप्त संताप आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गुंडांची यादी प्रसिद्धच झाली आहे...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही नकार देत असले तरी, त्यांच्या पक्षात किती गुंड आहेत, याची यादीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आम्ही त्याविषयी काही सांगण्याची गरज नाही. पाच राज्यांच्या निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतून भाजपला त्यांच्याबद्दलची लोकभावना कळेल. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले. ंजगताप अपघाताने आमदार झाले!विलासराव जगताप हे अपघाताने आमदार झाले आहेत. सेंटीमीटरची पट्टी घेऊन ते हिमालय मोजण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे जातीवादी राजकारण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लोकच त्यांना योग्यवेळी उत्तर देतील, असे कदम म्हणाले. घटस्फोट झालाच आहेमुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत टोकाचा संघर्ष सुरू आहे. त्यांचा घटस्फोट झालेलाच आहे. केवळ समझोत्यासाठी नवरा-बायकोस जशी सहा महिन्यांची मुदत मिळते, तशीच मुदत या दोन्ही पक्षांना मिळाली आहे, असे कदम म्हणाले. राष्ट्रवादीने फसविलेज्याच्या जागा जास्त, त्याचा अध्यक्ष, असे धोरण राज्यातील सर्व संस्थांमध्ये ठरले होते. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत हे सूत्र स्वीकारण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आणि कॉंग्रेसला फसविले. आगामी काळात आघाडीची वेळ आली तरीही जागांच्या संख्येवर पदांचे वाटप करण्याला आमचे प्राधान्य राहील, असे कदम म्हणाले.