शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी वाढीचा झटका

By admin | Updated: March 4, 2016 23:50 IST

महापालिका अंदाजपत्रकात घोषणा शक्य : आठवरून अकरा रुपयांपर्यंत वाढ

सांगली : महापालिकेने पुढील २०१६-१७ या आर्थिक वर्षात पाणीपट्टीत वाढ करून नागरिकांना झटका देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेच्या अंदाजपत्रकात वाढीव पाणीपट्टी कराची घोषणा केली जाणार आहे. सध्या आठ रुपये प्रति हजार लिटर दराने नागरिकांना पाणी पुरविले जाते. आता ते अकरा रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी सन २०१६-१७चे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले आहे. या अंदाजपत्रकात शंभर टक्के थकबाकी वसुली, महसूल विभागाची शंभर टक्के उद्दीष्टपूर्ती यावर भर दिला आहे. पण प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता अशा कोणत्याही करात वाढ केलेली नाही. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने नव्या योजनांना बगल देत शासकीय अनुदानाच्या कुबड्यावर हे अंदाजपत्रक तयार केले आहे. लवकरच स्थायी समितीकडून या अंदाजपत्रकात काही नव्या सूचनांचा समावेश करून महासभेकडे सादर केले जाणार आहे. त्याची तयारी जोमाने सुरू आहे. शुक्रवारी महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, आयुक्त अजिज कारचे यांच्यासह विरोधी पक्षाचे गटनेते, सभागृह नेते व अधिकाऱ्यांची अंदाजपत्रकाबाबत बैठक झाली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनीच पाणीपट्टी वाढीची सूचना मांडली आहे. शहराजनजिकच्या एका नगरपालिकेत प्रति हजार लिटर १२ रुपये दराने नागरिकांना पाणी पुरविले जाते. त्या धर्तीवर सांगली महापालिकेनेही पाणीपट्टीत वाढ करावी, असा प्रस्ताव समोर आणला आहे. सध्या महापालिकेकडून प्रति हजार लिटरमागे आठ रुपये दर आकारणी केली जात आहेत. तर बिगर घरगुतीसाठी ३० रुपये आकारले जातात. सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात मिळून ७१ हजार नळ कनेक्शनधारक आहेत. पाणीपट्टीची थकबाकीही ३५ कोटीच्या घरात आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. स्थायी समितीकडून महासभेकडे सादर होणाऱ्या अंदाजपत्रकात पाणीपट्टी वाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात करवाढीच्या रुपाने नागरिकांचे कबंरडे मोडण्याचाच प्रस्ताव आणला आहे. (प्रतिनिधी)उत्पन्न, खर्चाचा ताळमेळ बसेनामहापालिकेने पाणीपट्टीतून २८ कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवली होती. त्यापैकी १४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. तर आतापर्यंत १९ कोटी रुपयांचा खर्च पाणीपुरवठा विभागावर झाला आहे. उत्पन्न व खर्चात दरवर्षी पाच ते सहा कोटींची तूट असते. ही तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टी वाढीचा उपाय शोधला आहे.