शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पाणीपुरवठा अधिकारी धारेवर

By admin | Updated: June 25, 2015 22:47 IST

ठेकेदाराची पाठराखण : स्थायी समितीची सभा; अहवाल देण्याचे आदेश

सांगली : महापालिकेच्या माळ बंगला येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची मुदत संपली आहे. तरीही प्रशासनाकडून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जात नसल्याच्या कारणावरून बुधवारी स्थायी समिती सभेत सदस्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यासंदर्भात चौकशी करून पुढील स्थायीच्या सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले.स्थायी समितीची सभा सभापती संजय मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांगली व कुपवाड शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी माळ बंगला येथे ७० एमएलडी जलशुध्दीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. आयुक्तांनी १३ व्या वित्त आयोगातून ठेकेदाराला १ कोटी ८० लाखांचा धनादेश दिला आहे. तरीदेखील ठेकेदार संथगतीने काम करत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. शिवाय या ठेकेदाराची कामाची मुदत दीड वर्षापूर्वी संपली असताना, प्रशासन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता पाठराखण सुरू असल्याचा आरोप विष्णू माने यांनी केला. याप्रकरणी सभापती मेंढे यांनी चौकशी करून पुढच्या सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शासकीय फंडातून ४० लाखांचा पावसाळी मुरूम विनानिविदा टाकण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी निविदापाणी शुध्दीकरणासाठी ५३ लाखांची तुरटी खरेदीसाठी निविदा काढण्याचा विषय सभेच्या अजेंड्यावर होता, मात्र विषयपत्रामध्ये बीएसए पावडर खरेदी करण्याचे नमूद केले होते. यामुळे सदस्य विष्णू माने यांनी सभेत जाब विचारला. प्रशासनाने प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे कारण सांगितले. यामुळे सदस्यांनी या विषयासह ९ लाखांची ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी निविदा काढण्याच्या विषयाला मान्यता दिली.