शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनांवरून हल्लाबोल

By admin | Updated: December 15, 2015 23:24 IST

तासगाव पंचायत समिती सभा : शासनाच्या विभागांकडून हलगर्जीपणा

तासगाव : तासगाव तालुक्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीच्या पाणी योजनांसाठी दुप्पट वीजबिल वसूल केले जात आहे. प्रादेशिकच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाकडून आणि शासनाकडून हालगर्जीपणा केला जात आहे, अशा शब्दात टंचाई आणि पाणी योजनांवरून पंचायत समितीच्या सदस्यांनी मासिक सभेत हल्लाबोल केला. राज्य शासनाच्या अनेक विभागाकडील अधिकाऱ्यांकडून सदस्यांच्या मागण्यांबाबत हालगर्जीपणा केला जात असल्याचा आरोपही यावेळी संतप्त सदस्यांनी केला.सभापती सुनीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. गटविकास अधिकारी सतीश गाढवे, उपसभापती अशोक घाईल यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विसापूर, पुणदी योजनांतून पाणी मिळत नाही. पाणी पाहिजे असल्यास दुप्पट वीजबिलाची वसुली केली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पुणदी उपसा योजनेत सावळजचा समावेश नसल्याबाबत अधिकाऱ्यांकडून दिशाभूल केली जात आहे. सावळजच्या ग्रामस्थांनी पैसे भरले म्हणून पाणी दिले असेल तर, योजनेत नसलेल्या सर्वच गावांना असे पाणी देणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करून सावळजला पुणदी योजनेचे पाणी मिळायलाच हवे, अशी मागणी व्यक्त केली. पुणदी योजनेचे पाणी घेण्यासाठी पुणदीसह ताकारी योजनेचे दुहेरी वीजबिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.सदस्य विश्वास पाटील, प्रभाकर पाटील, शिवाजी पाटील यांनीही पाणी प्रश्नाबाबत शासन गाफील असल्याचा आरोप केला. तालुक्यातील पाणी योजना बंदअवस्थेत असल्यामुळे द्राक्षबागांसाठी टँकर सुरू करावे लागत आहेत. प्रादेशिक योजनांतील १४ गावांनी शंभर टक्के पाणीपट्टी भरली आहे. तरीही अन्य गावांच्या वसुलीअभावी मणेराजुरी, विसापूर योजना बंद झाली आहे. टंचाई निधीतून शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाकडील सार्वजनिक बांधकाम, महावितरणसह अन्य विभागांकडून नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या जात नाहीत. सदस्यांनी मागणी केलेली कामे तीन वर्षांपासून मार्गी लागलेली नाहीत. काही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामात हालगर्जीपणा केला जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उपसभापती अशोक घाईल, सदस्य शिवाजी पाटील यांनी केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तासगाव ते वासुंबे रस्ता आणि तासगाव ते आरवडे रस्ता असल्याचा आरोप सदस्य जयवंत माळी यांनी केला. (वार्ताहर)सभेतील प्रमुख निर्णय, ठराव तासगाव तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर कराअनधिकृत नळ कनेक्शनधारकांसाठी ७० अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीमअनधिकृत नळकनेक्शनधारक आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा निर्णय.पाणी योजनांची पाणीपट्टी माफ करा