शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी देण्याचे काम माझे नाही!

By admin | Updated: April 19, 2016 00:57 IST

तहसीलदारांचे उर्मट उत्तर : उमदीत घेराव, पत्रकारांनाही अरेरावी

उमदी : उमदी (ता. जत) येथे टॅँकरच्या मागणीसाठी तहसीलदार अभिजित पाटील यांना ग्रामस्थांनी सोमवारी घेराव घातला. ग्रामस्थांनी जाब विचारण्याचा प्रयत्न करताच तहसीलदारांनी ‘पाणी देण्याचे काम माझे नाही, ती गटविकास अधिकारी, ग्रामसेवकाची जबाबदारी आहे’, असे सांगत उध्दट वर्तन केले. यावेळी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना अरेरावी करीत ‘तुम्हाला कुणी निमंत्रण दिले?’ असे म्हणून कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. उमदी परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. ४१ किलोमीटर अंतरावरील अंकलगी तलावातून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे आमचा पाणीप्रश्न सोडवा, अशी मागणी उमदी दौऱ्यावर आलेल्या तहसीलदार पाटील यांना ग्रामस्थांनी केली. मात्र ती धुडकावून लावताना ‘तुम्हाला पाणी देण्याचे काम माझे नाही, तर ते गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांचे आहे’, असा अजब खुलासा करीत त्यांनी गावातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला. यावेळी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना अरेरावी केली. कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. संतापून पत्रकारांच्या अंगावर धावून जात ‘तुम्हाला कोणी बोलावले’ असा उध्दट सवाल केला. या प्रकाराने ग्रामस्थांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)निलंबित कोतवाल सोबतीला!तहसीलदार अभिजित पाटील सोमवारी पहाटे उमदी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी आले होते, असे समजते. त्यांच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी पत्रकारांशी हुज्जत घातल्याने निलंबित करण्यात आलेला गावकामगार कोतवाल सुभाष कोळी होता. यामुळे निलंबित कोतवालास सोबत घेऊन तहसीलदार कशी कारवाई करीत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तलाठ्याने जोडले हात!उमदीचे तलाठी बंडगर यांना बेकायदा वाळू वाहतुकीसंदर्भातील कारवाईची माहिती विचारली असता, त्यांनी थेट हात जोडून ‘मला यातले काही विचारू नका, पाण्याचे काय ते विचारा, सगळे सांगतो’ अशी विनवणी केली. महसुली अधिकारीच हतबल असल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न आहे.