शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटककडे पाणी रवाना

By admin | Updated: April 26, 2016 00:46 IST

सहा दिवस पाण्याचे नियोजन : पाटबंधारे विभागाची यंत्रणा सज्ज

सांगली : कमी पर्जन्यमानामुळे कर्नाटकात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारपासून राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता पाणी मोजून सोडण्यास सुरुवात झाल्याचे व पुढील सहा दिवसात पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी सांगितले. शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यापासून कर्नाटकातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे कर्नाटकातील अनेक भागात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारने कृष्णा नदीतून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, धरणात असलेल्या कमी पाणीसाठ्यामुळे वारणा (चांदोली) व कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या पाण्याचे नियोजन करण्यासाठी दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली होती. यात दोन दिवसात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार होते. या एक टीएमसी पाण्यासाठी कोयनेतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळपासून कर्नाटकला पाणी सोडण्याची कार्यवाही सुरु झाली. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातील नारायणपूर योजनेतून एक टीएमसी पाणी अक्कलकोटसाठी सोडण्यात येणार आहे. कर्नाटकातून मात्र, अजूनही अक्कलकोटसाठी पाणी सोडण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी) अक्कलकोटला पाणी नाहीचदोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्यातील पाटबंधारे प्रशासनाने यंत्रणा कामी लावत, दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवारपासून कर्नाटकला पाणी देण्यास सुरुवात केली. कर्नाटकातून अक्कलकोटला मिळणाऱ्या पाण्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत माहिती घेतली असता, अक्कलकोटला पाणी देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.अधिकाऱ्यांच्या बैठकीतील निर्णयानुसार कर्नाटकला पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दर तासाला मोजणी करण्यात येणार असून पुढील सहा दिवसात एक टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी त्याठिकाणी थांबून असल्याने पाणी सोडण्यात अडचण येणार नाही.- हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग