शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान सदस्यांच्या अपेक्षांवर पाणी

By admin | Updated: October 6, 2016 01:12 IST

जत पंचायत समितीत १८ गण : बारा गणात इच्छुकांची संधी हुकली

जत : जत तालुका पंचायत समितीतील १८ मतदार संघांची बुधवारी येथील तलाठी हॉलमध्ये प्रांताधिकारी अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी तहसीलदार अभिजित पाटील व पंचायत समिती गटविकास अधिकारी डी. आर. मडके उपस्थित होते.या नवीन आरक्षण सोडतीमुळे विद्यमान पंचायत समितीमधील एकाही सदस्याला परत संधी मिळणार नाही. याशिवाय अठरापैकी बारा गणातील इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे, तर सहा मतदारसंघ सर्वसाधारण झाले आहेत. त्यामुळे तेथे इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. तेथील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.माडग्याळ पंचायत समिती मतदार संघ अनुसूचित जाती (पुरुष) राखीव झाला आहे. त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार सरदार पाटील, विठ्ठल निकम, सोमाण्णा हक्के, कृष्णदेव गायकवाड यांना संधी मिळणार नाही. जाडरबोबलाद मतदार संघ अनुसूचित जाती (स्त्री) राखीव झाला आहे. त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार महादेव अंकलगी, तम्मणगौडा रवी बसवराज बिराजदार, संतोष पाटील, भीमराया बिराजदार यांना संधी मिळणार नाही.खोजानवाडी, दरीबडची, संख हे तीन मतदार संघ ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) स्त्री गटासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार मारुती पवार, रामगोंडा संती, आनंदराव पाटील, पिराप्पा माळी, साहेबराव टोणे, आर. के. पाटील, सुभाष पाटील, दयगोंडा बिराजदार यांना संधी मिळणार नाही.गिरगाव व बिळूर हे दोन मतदार संघ ओबीसी पुरुष गटासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे येथील इच्छुक उमेदवार दादासाहेब माने, बिळयानी बिराजदार, हणमंत दुधगी, पी. एम. पाटील, अ‍ॅड. बी. ए. धोडमणी यांना संधी मिळणार नाही.येळवी, मुचंडी, उमराणी, कोसारी, उमदी हे पाच मतदार संघ सर्वसाधारण स्त्री राखीव झाले आहेत. त्यामुळे प्रकाश जमदाडे, आर. के. माने, सुनील पवार, रमेश पाटील, आप्पू बिराजदार, सतीश चव्हाण, अ‍ॅड. एम. के. पुजारी, मल्लेश कत्ती, आप्पासाहेब नामद, शिवू तावशी, प्रकाश भोगले, नाथा पाटील, प्रभाकर जाधव, माणिक वाघमोडे, संजय सावंत, सुनील पोतदार आदी इच्छुक उमेदवारांना येथून संधी मिळणार नाही. शेगाव, डफळापूर, तिकोंडी, करजगी, बनाळी, बाज हे मतदार संघ सर्वसाधारण पुरुष राखीव झाले आहेत. त्यामुळे लक्ष्मण बोराडे, रवी पाटील, महादेव साळुंखे, एन. डी. शिंदे, भीमराव शिंदे, मन्सूर खतीब, अभिजित चव्हाण, जे. के. माळी, सज्जन चव्हाण, मनोज जगताप, सुभाष गोब्बी, रमेश जगताप, मधुकर शिंदे, रवींद्र सावंत, प्रमोद सावंत, बाबासाहेब कोडग, विलास पाटील, आप्पा मासाळ, अरविंद गडदे, शंकर वगरे, कुंडलिक दुधाळ यांना या मतदार संघातून संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे चुरस निर्माण होऊन येथील निवडणूक लक्षवेधी राहणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. (वार्ताहर)