शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडप्रकरणी संघटनेच्या तथाकथित नेत्याची चप्पलने धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:20 IST

सांगली : आंदोलनांतून स्टंटबाजी करण्यात तरबेज असलेल्या सांगलीतील एका संघटनेच्या नेत्याची कुपवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी छेडछाडप्रकरणी चप्पल आणि बुटाने धुलाई केली. या धुलाईचा मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेला व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, हा प्रकार उजेडात आला. पोलिस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले, पण तेथे या नेत्याने माफीनामा लिहून दिल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.

सांगली : आंदोलनांतून स्टंटबाजी करण्यात तरबेज असलेल्या सांगलीतील एका संघटनेच्या नेत्याची कुपवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी छेडछाडप्रकरणी चप्पल आणि बुटाने धुलाई केली. या धुलाईचा मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेला व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, हा प्रकार उजेडात आला. पोलिस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले, पण तेथे या नेत्याने माफीनामा लिहून दिल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.

मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाºया दोन विद्यार्थिनी दुपारी दुचाकीवरून विश्रामबाग चौकामार्गे मिरजेला निघाल्या होत्या. त्याचवेळी हा नेताही त्याच्या मोटारीतून मिरजेला निघाला होता. विश्रामबागपासून काही अंतरावर गेल्यानंतर या नेत्याने या विद्यार्थिनींच्या आडवी मोटार मारली. त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. या प्रकारामुळे विद्यार्र्थिनी घाबरल्या. त्यामुळे त्यांनी सुसाट वेगाने दुचाकी पळवली, तरीही त्याने त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी विजयनगर चौकात दुचाकी थांबवून या नेत्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने त्यांच्याशी अरेरावीची व अर्वाच्य भाषा सुरू केली. विद्यार्थिनींनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे लोक जमा होतील, या भीतीने त्याने मोटारीतून कुपवाडकडे पलायन केले. दरम्यान, विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी सांगितला. काही वेळातच त्यांचे नातेवाईक तेथे दाखल झाले.

हा नेता कुपवाडच्या दिशेने गेल्याचे समजताच त्याचा पाठलाग करण्यात आला. त्याला कुपवाडमध्ये गाठण्यात आले. तेथे मोटारीतून ओढून त्याची धुलाई सुरू केली. दोन्ही विद्यार्थिनींनी पायातील बूट व चप्पलने त्याचा चेहरा सडकून काढला. नेत्याने हात जोडून माफी मागितली. मात्र जमावाने त्याची ह्यवरातह्ण कुपवाड पोलिस ठाण्यापर्यंत नेली. यातील एक विद्यार्थिनी माजी आमदाराची नात आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार होता, परंतु तो फारच गयावया करू लागल्याने विद्यार्थिनींच्या पालकांनी गुन्हा दाखल केला नाही. सायंकाळी त्याला सोडून देण्यात आले.रेकॉर्डवरील गुन्हेगार

हा नेता संघटनेचा चार-पाच जिल्ह्यांचा तथाकथित अध्यक्ष आहे. आंदोलनांतून स्टंटबाजी करण्यात तो तरबेज आहे. यापूर्वी त्याच्यावर बलात्कार, विनयभंग, खंडणी, धमकावणे, मारामारी असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याला तडीपारही केले होते. या सर्व कारवायातून तो काही वर्षांपूर्वी बाहेर आला आहे. आता त्याच्या धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.