आष्टा : आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा आष्टा शहर शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना आष्टा शहरप्रमुख राकेश आटुगडे व नंदकिशोर आटुगडे यांनी दिले.
आष्टा शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला असून मागील दोन वर्षांपासून प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. पुतळा समिती स्थापन झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी गणेश माळी, नगरसेवक वीर कुदळे, अर्चना माळी, स्वप्नील माने, रवींद्र तोडकर, गजानन दाटिया उपस्थित होते.
फोटो: २९०१२०२१-आयएसएलएम-आष्टा निवेदन न्यूज
: आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, यासाठी निवेदन देताना शिवसेनेचे राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, नगरसेवक वीर कुदळे, गणेश माळी.