शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याच्या सुखात आनंद मानण्याची सवय हवी

By admin | Updated: July 20, 2014 23:43 IST

धनंजय गुंडे : जैन मंदिरात आयोजित सत्संग सोहळ्यात

सांगली : सध्याच्या काळात बहुतेकांचा व्यवहार हा स्वकेंद्रित झाला आहे. आपण समाजाचा घटक आहोत हे कायम लक्षात ठेवून, दुसऱ्या व्यक्तींच्या सुखात आनंद मानण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे, असे आवाहन डॉ. धनंजय गुंडे यांनी केले. शहरातील दत्तनगरमध्ये श्री १००८ भ. शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात आयोजित सत्संग सोहळ्यात ‘हे जगणे आनंदाचे’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर विद्यानंदीजी महाराज उपस्थित होते.चातुर्मासानिमित्त जैन मंदिरात सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. गुंडे पुढे म्हणाले, यश मिळविण्यासाठी प्रत्येकाने पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर यश मिळाले नाही दु:ख करीत बसण्याचे कारण नाही. जगात सध्या धर्माच्या आधारावर युध्द सुरु आहे. परंतु धर्म म्हणजे कर्तव्यपालन, हा भावार्थ कोणी लक्षातच घेत नाही. प्रत्येक व्यक्तीने त्याचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, तर संपूर्ण जगातच शांतता नांदण्यास वेळ लागणार नाही. धावपळीच्या युगात देशाचे आधारस्तंभ असलेली युवक पिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. त्यांचा ओढा फास्ट फुडकडे वाढत चालला आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने मांसाहाराचा त्याग करुन शाकाहाराकडे वळले पाहिजे. शाकाहार हा सात्त्विक आहार आहे. आपण ज्याप्रकारचे अन्न खातो, त्याप्रकारची आपली वृत्ती तयार होते. दैनंदिन जीवनात काम, क्रोध, मोह, माया यापासून सर्वांनीच लांब राहिले पाहिजे, असेही डॉ. गुंडे यांनी सांगितले. प्रास्ताविक अजय कारंजे यांनी केले. डॉ. गुंडे यांचा सत्कार कुमार तिप्पाणावर यांनी केला. सत्संग सोहळ्याच्या अखेरीस विद्यानंदीजी महाराजांनी श्रावक, श्राविकांना आशीर्वचन दिले. वीरमाता महिला मंडळाने जीनवाणी स्तुती करुन सोहळ्याची सांगता केली. (प्रतिनिधी)