शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगरसह सात गावांत पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 5, 2017 23:23 IST

माधवनगरसह सात गावांत पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महावितरणने २५ लाखांच्या वीज बिल थकबाकीपोटी वीज पुरवठा तोडल्याने माधवनगरसह चार गावांची पाणी योजना बंद होऊन १२ दिवस पूर्ण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरु आहे. माधवनगर व बुधगाव या गावांनी थोडीफार रक्कम जमा केली आहे. पण कवलापूर व बिसूरने अद्याप एक रुपयाही जमा केला नसल्याने, अजून सहा ते सात दिवस पाणी येणार नसल्याची शक्यता आहे. कधी जलवाहिनीला गळती, तर कधी वीज पुरवठा बंद, या कारणामुळे माधवनगरची पाणी योजना सातत्याने बंदच राहिली आहे. वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ ४० ते ४५ वेळा माधवनगर, बुधगाव, कवलापूर व बिसूर या गावात पाणी येते. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झाली. लोकप्रतिनिधी व उमेदवारांनी पाणीप्रश्न सोडविण्याची हमी दिली. पण गेल्या १२ दिवसांपासून या गावात पाणी नाही, याची साधी चौकशीही त्यांनी केली नाही. मे महिना असल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकेवर दहा ते पंधरा मिनिटे हापसल्यानंतर एक घागर पाणी येत आहे. कूपनलिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र उन्हाळ्यामुळे पाणीच येत नसल्याने ग्रामस्थांना सायकलला कॅन, घागरी अडकवून आसपासच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. कवलापूरला एका तरुणाने वीस रुपयाला ४० लिटर घरपोच पाणी, अशी योजना सुरु केली आहे. हा तरुणही बाहेरुन कूपनलिकेचे पाणी आणून लोकांची तहान भागवत आहे. ज्या घरगुती कूपनलिकांना पाणी आहे, तिथे एक रुपयाला २० ते ३५ लिटरचा एक प्लॅस्टिकचा कॅन भरुन पाणी दिले जात आहे. तिथे पाण्यासाठी २४ तास गर्दी आहे. खर्चाच्या पाण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेऊन माधवनगर, बुधगाव ग्रामपंचायतीने चार-पाच लाख रुपयांची जुळवाजुळव केली आहे. अजूनही बिल भरण्यास तीन-चार लाख रुपये कमी पडतात. कवलापूर व बिसूरने ही रक्कम दिली असती, तर आतापर्यंत योजना सुरु झाली असती. बिसूरकरांची ६० हजारची जुळणी झाली आहे. कवलापूरकर मात्र, अजून जुळणी झाली नाही, असे सांगून हात वर करत आहेत. त्यांच्यामुळे योजना सुरु होण्यास विलंब होत आहे. कवलापुरात सोसायटीचा आधारकवलापूर येथे विकास सोसायटीने गतवर्षी शुद्धपेय जल योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत एक रुपयाला २० लिटर पाण्याची विक्री केली जात आहे. सभासद झाल्यास सोसायटी एटीएम कार्ड देते. या कार्डद्वारे पाच रुपयांना २० लिटर आणि कार्ड नसेल, तर पाच रुपयाचे क्वाईन टाकून दहा लिटर पाणी घेता येते. गेल्या १२ दिवसांपासून पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी सोसायटीमध्ये सकाळी सहापासून ते रात्री बारापर्यंत ग्रामस्थांच्या रांगा लागलेल्या असतात. उन्हाळ्यामुळे सोसायटीच्या कूपनलिकेला पाणी कमी येत आहे. ग्रामस्थांची गैरसोय नको, म्हणून सोसायटीने बाहेरून दररोज पाच हजार लिटरचे चार ते पाच टँकर खरेदी करुन शुद्ध पेय योजना नियमित सुरु ठेवली आहे.