शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीला प्रतीक्षा कडाक्याच्या थंडीची, शाळू, हरभऱ्याची वाढ मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

फोटो १३ संतोष ०१ यंदा चांगल्या पाऊसमानामुळे शाळू बहरला असला तरी, आता पुरेशा थंडीची आवश्यकता आहे. -- लोकमत न्यूज ...

फोटो १३ संतोष ०१

यंदा चांगल्या पाऊसमानामुळे शाळू बहरला असला तरी, आता पुरेशा थंडीची आवश्यकता आहे.

--

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : डिसेंबरचा पंधरवडा संपला तरी जिल्ह्यात कडाक्याची थंडी सुरू झालेली नाही. कधी थंडी तर कधी उष्णता, अशा लहरी हवामानामुळे रब्बीची वाढ मंदावली आहे. विशेषत: शाळू व हरभरा पिकासाठी पोषक ठरणाऱ्या थंडीची अजूनही प्रतीक्षाच आहे.

एरवी नोव्हेंबर महिना थंडी घेऊनच येतो. पण यंदा तशी स्थिती नाही. डिसेंबरचा पंधरवडा संपला तरी अजूनही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. रात्री उशिरापर्यंत तापमानाचा पारा चढलेलाच असतो. पहाटे थोडासा कडाका वाढतो, पण दिवसभर उन्हे तापलेली असतात. या विचित्र हवामामुळे रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण मिळेनासे झाले आहे. शाळू, हरभरा, गहू, करडई ही पिके म्हणावी तशी पोसलेली नाहीत.

यंदा पुरेशा पावसामुळे विहिरी, कूपनलिकांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्याच्याआधारे, शाळू, हरभरा फुलविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. द्राक्षबागांसाठी मात्र वाढते तापमान फायद्याचे ठरत आहे. सध्या फळधारणा सुरू असून बागा चांगल्याच पोसवल्या आहेत. कमी प्रमाणातील थंडीमुळे द्राक्षमणी तडकण्याचा धोका टळला आहे.

चौकट

धुक्यामुळे चिकटा

पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरत असल्याने शाळूवर चिकट्याचा प्रादुर्भाव होत आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात उष्णतेचा अभाव असल्याने धुके उशिरापर्यंत टिकून राहते, ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरली आहे.

कोट

सध्या शाळू पोटरीतून बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. गारठा वाढला तरच कणसे चांगली भरतील. दिवसभराच्या वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा हरवत आहे.

- किरण शेळके, शेतकरी, बेडग

-------------

--------