शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम टप्प्यातही कवठेमहांकाळ तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST

फोटो ओळी : दुधेभावी (ता. कवठेमहंकाळ) येथील तलावातील उपलब्ध पाणीसाठा. जालिंदर शिंदे घाटनांद्रे : पावसाळा संपायाला काही दिवसच बाकी ...

फोटो ओळी : दुधेभावी (ता. कवठेमहंकाळ) येथील तलावातील उपलब्ध पाणीसाठा.

जालिंदर शिंदे

घाटनांद्रे : पावसाळा संपायाला काही दिवसच बाकी राहिले असतानाही कवठेमहंकाळ तालुक्यातील बऱ्याच भागात ओढे, नाले, बंधारे अद्यापही कोरडे ठणठणीत आहेत. तालुक्यातील एकूण अकरा तलावांपैकी नृसिंहगाव (लांडगेवाडी) तलावात कमी पाणीसाठा असल्याने सील करण्यात आला आहे. तर कुची, बंडगरवाडी तलावात जेमतेम पाणीसाठा आहे. दुधेभावी व लंगरपेठ तलावात टेंभू सिंचन योजनेचे पाणी सोडल्याने त्याला चांगलाच आधार मिळाला आहे. उर्वरित तलावही सिंचन योजनेतून भरण्याची गरज निर्माण झाली आहे.

शासकीय आकडेवारीनुसार तालुक्यातील अकरा तलावांपैकी रायवाडी व दुधेभावी तलावात समाधानकारक पाणीसाठा आहे. लंगरपेठ तलावात टेंभूचे पाणी सोडल्याने बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. उर्वरित तलावातील पाणीसाठा चिंताजनक आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. गतवर्षी अवकाळीसह मोसमी पाऊस झाल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यासह नागज, ढालगाव या कायमस्वरुपी टंचाईग्रस्त असणाऱ्या गावात यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. तसेच तलावातील पाणीसाठाही बऱ्यापैकी होता.

सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे उगवण झालेल्या या खरीप हंगामातील पिकांची वाढ होत असली, तरी जमिनीबरोबर तलावातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

सध्या म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी कवठेमहांकाळ व जत तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा वापर करून लांडगेवाडी, बंडगरवाडी, बोरगाव, नांगोळे, हरोली व बसप्पावाडी हे तलाव भरून घेणे शक्य आहे.