शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

व्यंकाप्पा पत्की यांचे निधन

By admin | Updated: June 15, 2014 00:22 IST

सांगलीच्या राजकारणात अभ्यासू राजकारणी म्हणून प्रदीर्घ काळ छाप

सांगली : सांगलीच्या राजकारणात अभ्यासू राजकारणी म्हणून प्रदीर्घ काळ आपली छाप सोडणारे माजी आमदार व्यंकाप्पा ऊर्फ व्यंकटेश नारायण पत्की (वय ६५) यांचे आज, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मिरजेतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सांगलीच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ त्यांचा प्रभाव होता. राजकारणातील चाणक्य म्हणूनही ते परिचित होते. सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शास्त्र शाखेची व एन. एस. विधी महाविद्यालयात कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी चळवळीत काम केले. १९७५ ते ७७ च्या कालावधित आणीबाणीत त्यांना १९ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. समाजवादी पक्ष, जनता दलाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकीर्द घडविली. राजारामबापू यांचे ते अनुयायी होते. राजारामबापूंनी कॉँग्रेस सोडून जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पत्कीही त्यांच्यासोबत होते. सांगलीच्या राजकारणातही त्यांचा दबदबा होता. आ. संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांच्या राजकीय जडणघडणीतही त्यांचा वाटा होता. १९९४ ते २००० या कालावधित त्यांनी विधानपरिषदेवर काम केले. सभागृहात कायदेशीर व अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी प्रभाव पाडला. २००० मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविण्यात आले होते. कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. लोकनायक शिक्षण संस्थेचे संस्थापक तसेच विविध शासकीय, निमशासकीय समित्या, संस्थांवर त्यांनी काम केले. ग्रंथालय चळवळीतही त्यांचा मोठा वाटा आहे. ग्रंथालयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पत्की यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने अभ्यास समिती नियुक्त केली होती. पत्की अहवाल म्हणून तो सभागृहात सादर झाला होता. सांगलीच्या राजकारणातील सुरुवात नगरपालिकेच्या माध्यमातून झाली. नागरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी १९८५ ते १९९० या कालावधित स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केले. सर्वोदय कारखान्याचे पद सोडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे. (प्रतिनिधी)