काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक हारूण शिकलगार यांचे २९ जुलै २०२० रोजी निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. कोल्हापूरसह अन्य काही महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच प्रभाग क्रमांक १६ अ मधील पोटनिवडणुकीसाठीही मतदार यादी तयार करण्याचे आदेश मंगळवारी निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०२१ रोजीची विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत १६ फेब्रुवारी २०२१ आहे. या यादीवर हरकती व सूचना घेण्याची मुदत १६ फेबुवारीपर्यंत आहे. यानंतर ३ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. आठ मार्चला मतदान केंद्राची, तर १२ मार्चला अंतिम व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST