शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

जत पालिकेसाठी १३ डिसेंबरला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:14 IST

जत : जत नगरपालिकेसाठी येत्या १३ डिसेंबरला मतदान होणार असून, १४ डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने मंगळवारी सायंकाळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्याचवेळी आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय नेतेमंडळी सतर्क झाली आहेत.जत शहराची लोकसंख्या ४५ हजार असून मतदारसंख्या सुमारे ३० हजार आहे. दहा प्रभाग असून एका ...

जत : जत नगरपालिकेसाठी येत्या १३ डिसेंबरला मतदान होणार असून, १४ डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने मंगळवारी सायंकाळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्याचवेळी आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय नेतेमंडळी सतर्क झाली आहेत.जत शहराची लोकसंख्या ४५ हजार असून मतदारसंख्या सुमारे ३० हजार आहे. दहा प्रभाग असून एका प्रभागात सरासरी तीन हजार मतदार आहेत. सदस्य संख्या वीस आहे. एका प्रभागातून दोन नगरसेवक व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडले जातील. नगरपालिकेची मुदत २२ डिसेंबररोजी संपणार आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर २ डिसेंबर २०१२ रोजी मतदान होऊन ३ डिसेंबर २०१२ रोजी मतमेजणी झाली होती. त्यानंतर पहिले मंडळ अस्तित्वात आले होते. आता होत असलेली ही दुसरी निवडणूक आहे.जत ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर नवीन मंडळ अस्तित्वात आले. परंतु कारभार मात्र ग्रामपंचायतीसारखाच सुरू होता. मागील वर्षभरात तत्कालीन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नगरसेवक, नागरिक आणि कर्मचाºयांना शहरात नगरपालिका आहे, याची जाणीव कामाच्या माध्यमातून करून दिली होती.डिसेंबर २०१२ मध्ये वसंतदादा विकास आघाडी व राष्टÑवादी आणि कॉँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. सुरुवातीस कॉँग्रेसला बाजूला करून विकास आघाडी व राष्टÑवादीने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीमधील नगरसेवकांत फूट पडली. विकास आघाडी व कॉँग्रेस आणि राष्टÑवादीमधील तीनपैकी दोन नगरसेवक एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यात आली. मागील महिन्यात वसंतदादा विकास आघाडी राष्टÑवादीत विलीन करण्यात आली. परंतु या आघाडीतील सर्वच नगरसेवकांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.काँग्रेसचे नेते जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत समर्थकांची सध्या नगरपालिकेत सत्ता आहे. वीसपैकी एकोणीस नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम व युवक कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचा जत शहरात कार्यक्रम घेऊन, त्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आगामी निवडणुकीतील उमेदवार, प्रचार यंत्रणा, प्रचारातील मुद्दे, आजपर्यंत केलेले काम व यापुढे करणार असलेले काम यावर त्यांचे यश अवलंबून राहणार आहे.आ. विलासराव जगताप यांनी शासनात सहभागी असलेल्या घटकपक्षांना सोबत घेऊन एक समिती स्थापन केली आहे. निवडून येणारा कार्यक्षम कार्यकर्ता असेल तर त्याला उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडून आण्ण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.आ. जयंत पाटील यांनी बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांना राष्ट्रवादीत घेऊन जत शहरातील पक्ष भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी शिंदे यांच्यावर सोपविली आहे.सत्ताधाºयांना जतचे नागरिक कंटाळले : विलासराव जगतापजत : जत शहरातील जनता नगरपालिकेतील सत्ताधाºयांना कंटाळली आहे. जनतेला बदल हवा आहे. आगामी निवडणुकीच्या माध्यमातून चांगल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निश्चित स्वरुपात बदल घडवून आणू, अशी माहिती आ. विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. शासनातील सहकारी घटकपक्षांना बरोबर घेऊन आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. युती करण्यासंदर्भात आम्ही इतर कोणत्याही पक्षाकडे प्रस्ताव दिलेला नाही. आमचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे आम्हाला इतर पक्षांकडे जाण्याची गरज नाही, असे सांगून आ. जगताप पुढे म्हणाले, कार्यक्षम व स्वच्छ चारित्र्य असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाईल.

टॅग्स :Politicsराजकारण