शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशक फवारून द्राक्षबागेचे नुकसान

By admin | Updated: December 14, 2014 23:52 IST

१४ लाखांचा फटका : एकावर गुन्हा

तासगाव : मतकुणकी (ता. तासगाव) येथे द्राक्षबागेवर तणनाशक फवारून सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. द्राक्ष बागायतदार सुरेश ज्ञानू मोरे यांनी याबाबत आज तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी उल्हास पांडुरंग सदाकळे (रा. मतकुणकी) या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९च्या पूर्वी ही घटना घडली होती.मतकुणकीतील गट नं. ३३२ ही चार एकर जमीन फिर्यादी सुरेश व त्यांचा भाऊ पांडुरंग मोरे यांच्या नावावर आहे. सुरेश मोरे हेच ही जमीन कसतात. त्यात सुमारे दीड एकर द्राक्षाची बाग आहे. दि. ५ नोव्हेंबर रोजी द्राक्षबागेची पाने वाळू लागल्यानंतर, बागेवर तणनाशक फवारण्यात आल्याचे लक्षात आले. सुरेश मोरे यांनी याबाबत शेजारील शेतकऱ्यांकडे विचारपूस केली होती.काही दिवसांनी सुरेश व त्यांचा भाऊ पांडुरंग मोरे यांनी शेताच्या आजूबाजूस पाहणी केली, तेव्हा बांधाकडेला ‘मीरा ७१’ या तणनाशकाच्या दोन रिकाम्या पुड्या पडलेल्या आढळल्या. तेथून जवळच मणेराजुरी येथील एका औषध विक्री केंद्राचे नाव असलेली रिकामी पिशवीही सापडली. त्यामुळे संबंधित दुकानात जाऊन मोरे यांनी हे औषध कुणी खरेदी केले होते, याची विचारपूस केल्यानंतर, दि. ४ रोजी संशयित उल्हास सदाकळे याने हे औषध खरेदी केल्याचे समजले, असे दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे द्राक्षबागेवर जाणूनबुजून तणनाशक फवारले असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. (वार्ताहर)