विटा : विटा शहरात सुविधा देण्यासाठी पालिका नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. शहरात विकासाचा आलेख उंचावत ठेवला आहे. आगामी काळात शहर राज्यात विकासाचे रोल मॉडेल ठरेल, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले.
विटा शहरातील फुलेनगर, ज्योतिबानगर उपनगरात नगरसेविका मालती कांबळे यांच्या पाठपुराव्यातून पूर्ण करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी पाणीपुरवठा सभापती मालती कांबळे, अजित गायकवाड, धर्मेश पाटील, विनोद पाटील, प्रशांत कांबळे, विश्वनाथ कांबळे, गजानन निकम, जे. के. कांबळे, विलास कांबळे, सुलिंदर कांबळे, विशाल भिंगारदेवे उपस्थित होते.
फोटो : विटा येथील विकास कामांचा प्रारंभ माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी मालती कांबळे, अजित गायकवाड, धर्मेश पाटील, प्रशांत कांबळे उपस्थित होते.