शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

विटा उपजिल्हा न्यायालय अडकले लाल फितीत

By admin | Updated: February 26, 2015 00:11 IST

न्यायाधीश निवासस्थानांचा प्रश्न : तीन तालुक्यांना एक तपापासूनची प्रतीक्षा

दिलीप मोहिते -विटा -खानापूर, कडेगाव व आटपाडी तालुक्यांतील पक्षकारांचा त्रास वाचविण्यासाठी येथे नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या उपजिल्हा न्यायालयाचा (सेशन कोर्ट) प्रस्ताव गेल्या सात ते आठ वर्षांपासून लाल फितीत अडकला असून न्यायालयीन इमारत तयार असतानाही केवळ न्यायाधीशांच्या निवासस्थानाचा प्रश्न अद्यापही न सुटल्याने अडचण निर्माण झाली आहे. तीन तालुक्यांसाठी येथे उपजिल्हा न्यायालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रस्तावही तयार करून तो मंजूर करण्यात आला. त्यासाठी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची जुनी इमारत जमीनदोस्त करून, कोट्यवधी रूपये खर्चून तीनमजली नवीन इमारत उभारण्यात आली. या इमारतीत सध्या चार न्यायालय हॉल, वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष, कार्यालयीन कामकाजाच्या स्वतंत्र खोल्या यासह अन्य सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. लाखो रुपये खर्चून फर्निचरही तयार करण्यात आले आहे. परंतु, उच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार, उपजिल्हा न्यायालयात काम करणाऱ्या न्यायाधीशांसाठी स्वतंत्र निवासस्थानांची उपलब्धता करावी लागणार आहे. विटा नगरपरिषदेने नाममात्र भाडेकराराने न्यायाधीशांसाठी स्वतंत्र सदनिका देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेच्या कौन्सिल सभेत ठरावही मंजूर करण्यात आला. परंतु पालिका प्रशासनाने दाखविलेल्या सदनिका नाकारण्यात आल्याचे समजते. विटा उपजिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी स्वतंत्र तीन एकर जागा उपलब्ध करून द्यावी, असे उच्च न्यायालयाचे म्हणणे असल्याचे समजते.शहरात शासनाच्या मालकीची एकाच ठिकाणी तीन एकर जागा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे विटा ते कार्वे रस्त्यालगत उमरकांचनजवळील शासनाच्या मालकीची तीन एकर जागा दाखविण्यात आली. ती जागाही शहरापासून दोन ते अडीच किलोमीटरवर असल्याने नाकारण्यात आली आहे. परिणामी, खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यांतील पक्षकारांची गैरसोय झाली आहे. खानापूरचे विभाजन होऊन कडेगाव तालुका अस्तित्वात आल्यानंतर त्याठिकाणी नवीन न्यायालय सुरू झाले आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यातील सुमारे ६० टक्के खटले तेथील न्यायालयात वर्ग झाले आहेत. खानापूर, कडेगाव, आटपाडी या तालुक्यांसाठी विटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. पण या तालुक्यांची जिल्हास्तरीय खटल्यांची कामे सांगली येथील जिल्हा न्यायालयात चालविली जातात. त्यामुळे पक्षकारांचा पैसा व वेळ जात आहे. त्यामुळे या तीन तालुक्यांसाठी विटा या मध्यवर्ती ठिकाणी उपजिल्हा न्यायालय सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झाले. परंतु, विट्यात न्यायाधीशांसाठी सरकारी निवासस्थाने उपलब्ध नसल्याने येथे उपजिल्हा न्यायालय सुरू होण्यास अडचण आली आहे.जागेचा प्रश्न सोडवण्याची गरजविटा येथील उपजिल्हा न्यायालयाचा प्रश्न गेल्या ८ ते १० वर्षांपासून प्रलंबित आहे. न्यायाधीशांच्या निवासस्थानांसाठी तीन एकर जागेची गरज आहे. परंतु, ही जागा शासनाकडे उपलब्ध नाही. दहीवडी, पाटण येथे उपजिल्हा न्यायालय सुरू झाले. तेथे न्यायाधीश निवासस्थानासाठी तीन एकर जागेची अट लावण्यात आली नाही. मग विट्यातच ही अट का लावण्यात आली? शासनाने पाठपुरावा करून लोकप्रतिनिधी व जनरेट्याद्वारे विटा उपजिल्हा न्यायालय सुरू करणे गरजेचे आहे, विटा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र भिंगारदेवे म्हणाले.