शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विटा पालिकेत पाणीपट्टी वाढीस विरोध

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

साडेचौसष्ट कोटीचा शिलकी अर्थसंकल्प : मूलभूत सुविधांसाठी भरीव तरतूद

विटा : विटा नगरपरिषदेच्या २०१६-२०१७ च्या ६४ कोटी ४६ लाख ६ हजार ५७ रूपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास विशेष सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण यांसह विविध मूलभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने मांडलेल्या वार्षिक ५०० रूपये पाणीपट्टी वाढीला दुष्काळाचे कारण देत नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनीच विरोध केला. त्यामुळे विटेकरांवरील पाणीपट्टी वाढीचे संकट दुष्काळामुळे टळले गेले. नगरपरिषदेच्या सभागृहात २०१५-२०१६ चा सुधारित व २०१६-२०१७ चा अनुमानित अर्थसंकल्प नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत मांडण्यात आला. प्रारंभी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. यावेळी आरंभीची शिल्लक १४ कोटी ८३ लाख १६ हजार ५७ रूपये व २०१६-२०१७ ची जमा ४९ कोटी ६२ लाख ९० हजार, असे एकूण ६४ कोटी ४६ लाख ६ हजार ५७ रूपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सभेत सादर करण्यात आला.यावर्षीच्या अर्थसंकल्पात शहरात नवीन बसस्टॉप उभारणी व देखभाल- दुरूस्तीसाठी १५ लाख, तर शहरातील चौकांचे सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी २५ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण कामासाठी ८ लाख २८ हजार ७०० व मागासवर्गीय कल्याणकारी योजनेसाठी ८ कोटी २८ लाख ७०० आणि अंध व अपंग कल्याण निधीसाठी ४ लाख ९७ हजार २०० रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ता दुरूस्ती, रस्ता दुभाजक व पूल बांधकामासाठी २ कोटी ७५ लाख रूपयांची भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासह बजरंगनगर येथील पाणीपुरवठा योजनेसाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे.या अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा झाली. या चर्चेत माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक किरण तारळेकर, विशाल पाटील, अनिल म. बाबर, कृष्णात गायकवाड यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा शितोळे, सौ. मीनाक्षी पाटील, माजी उपनगराध्यक्षा सौ. मालती कांबळे, नगरसेविका सौ. प्रतिभा चोथे, लता मेटकरी, मनीषा तारळेकर, स्वाती भिंगारदेवे, झाकीर तांबोळी, दहावीर शितोळे, हेमलता शितोळे, रूपाली मेटकरी, संजय कांबळे, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते. (वार्ताहर)दुष्काळी स्थिती : पाणीपट्टी वाढीला विरोधविटा शहराला घोगाव येथून कृष्णा नदीतून पिण्याचे पाणी आणले आहे. परंतु, या योजनेचा वाढता खर्च पाहता, ही योजना पूर्णपणे आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात दूर करण्यासाठी वार्षिक पाणीपट्टीत ५०० रूपयांची वाढ करावी, अशी सूचना प्रशासनाने मांडली. परंतु, दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी पाणीपट्टी वाढ करू नये, असा पवित्रा घेत नगरपरिषदेत सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांसह विरोधी गटानेही तीव्र विरोध केला.