शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

इस्लामपूरच्या ग्रंथप्रेमींची जवानांना पुस्तके भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 14:04 IST

काश्मीर येथे सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाºया जवानांच्या मनाला विरंगुळा देण्यासाठी आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी इस्लामपूर येथील ग्रंथप्रेमींनी लेह लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील जवानांना २०० पुस्तके भेट देत, अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली.

ठळक मुद्देजवानांना २०० पुस्तके भेट देत, अनोख्या पध्दतीने दिवाळी मराठी भाषा समृद्धीसाठी प्रयत्न; जवानांच्या मनाला विरंगुळा

इस्लामपूर ,दि. २५ :  काश्मीर येथे सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या  जवानांच्या मनाला विरंगुळा देण्यासाठी आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी इस्लामपूर येथील ग्रंथप्रेमींनी लेह लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील जवानांना २०० पुस्तके भेट देत, अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली.

ग्रंथमित्र सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लेखक डॉ. प्रा. संजय थोरात यांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसात दोनशे पुस्तके जमा करून, सुटीवर आलेल्या जवानांकडे ती सुपूर्द केली. लेह लडाख येथे असणारे अविनाश महाडिक (नेवरी, ता. कडेगाव) आणि काश्मीरला असणारे अक्षय खंजिरे (नांदणी) या दोन्ही लष्करी जवानांकडे एका समारंभात ही पुस्तके दिली.

इस्लामपूरच्या ग्रंथप्रेमींनी एकत्र येऊन ही पुस्तके जमा केली. यामध्ये निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, संजय बनसोडे, दीपक कोठावळे, सुखदेव माळी, युवराज निकम, अरुण कांबळे, विक्रम घाडगे, प्रा. दीपक स्वामी, राम घुले, प्राचार्य अंकुश बेलवटकर, नितीन शिंदे, विजय गायकवाड, अभियंता सुनील पाटील, वर्षाराणी मोहिते यांनी पुस्तके दिली.

यावेळी सुनील चव्हाण म्हणाले, आजवर लाखभर पुस्तके उपलब्ध करून सीमाभागातील व गडचिरोली जिल्ह्यातील ग्रंथालयांना भेट दिली. पण दिवाळीच्या निमित्ताने लष्करी जवानांच्या माध्यमातून आपल्या पुस्तकांचा समावेश जम्मू-काश्मीरमधील लष्करी ग्रंथालयात होत आहे.

थेट सीमेवर असणाऱ्या  मराठी बांधवांना आपल्या तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी या पुस्तकांचा उपयोग होईल. जवान अविनाश महाडिक म्हणाले, आमची यंदाची दिवाळी कायम स्मरणात राहील. बाबासाहेब परीट, दीपक पवार, प्रा. के. डी. कुरुंदवाडे, सतीश चौगुले, शामराव गावडे यावेळी उपस्थित होते. विनोद मोहिते यांनी आभार मानले.

टॅग्स :diwaliदिवाळीliteratureसाहित्य