सांगली : शिक्षण आणि बांधकाम विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अभ्यागतांना १ एप्रिलपासून जिल्हा परिषदेत प्रवेश बंदी घातली आहे. नागरिकांनी तक्रारी ऑनलाइन कराव्यात. फाईली स्वीकारण्यासाठी प्रवेशद्वारात कक्ष केला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
बांधकाम व अर्थ समिती सभापतींच्या स्वीय सहायकांसह बांधकाम, शिक्षण आदी विभागातील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, अधिकाऱ्यांची तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय, अन्य व्यक्तींना १ एप्रिलपासून प्रवेश देणे बंद करण्यात येणार आहे.
डुडी म्हणाले की, सामान्य प्रशासन विभागाकडून मेल आयडी दिला जाईल, यावर ऑनलाइनच तक्रारी, पत्रव्यवहार करावा. फाइल जिल्हा परिषद कक्षात जमा करावी, तशी व्यवस्था प्रवेशद्वारात केली आहे. गर्दी कमी झाल्यास कोरोनाचा संसर्गही वाढणार नाही. शासनाच्या सूचनेनुसारच प्रवेश बंद केला आहे.