शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’तर्फे सांगलीत गुरूवारी विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान

By admin | Updated: February 16, 2016 00:13 IST

वर्धापनदिनी कार्यक्रम : स्मार्ट सांगलीसाठी मिळणार नवा मंत्र

सांगली : ‘लोकमत’च्या सतराव्या वर्धापनदिना-निमित्त सांगलीत येत्या १८ फेब्रुवारीरोजी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांचे ‘स्मार्ट सिटीची संकल्पना आणि विकासाचे प्रयत्न’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त चौधरी यांचे विचार ऐकण्याची संधी जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात गुरुवार, १८ फेब्रुवारीस सायंकाळी पाच वाजता त्यांचे व्याख्यान होणार आहे. पर्यावरणशास्त्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या चौधरी यांनी समाजकारण आणि राजकारण या विषयावरही विपुल लेखन केले आहे. राज्यभर त्यांनी या विषयावर मतेही मांडली आहेत. त्यामुळे पर्यावरणासह विविध क्षेत्रात सांगलीच्या स्मार्टपणाला अस्तित्वात आणण्यासाठी आवश्यक असणारा मंत्रही ते यानिमित्ताने देणार आहेत. प्रस्थापित राजकारण्यांच्या पर्यावरणविरोधी, समाजविरोधी धोरणांना विरोध करताना, प्रबोधनाला चळवळीचे बळ देऊन गेल्या अनेक वर्षांपासून विश्वंभर चौधरी नावाचा लढवय्या महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष करीत आहे. परिवर्तनाच्या वाऱ्याला वादळाचे स्वरूप देऊन पर्यावरण संवर्धनासह, पर्यावरणाइतकेच स्वच्छ राजकारण आणि समाजकारण अस्तित्वात आणण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू आहे. केवळ प्रबोधन करून परिवर्तनाचे स्वप्न साकारता येत नसल्याने, एक मोठी चळवळ उभारून सातत्याने त्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते म्हणून पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी यांची ओळख देशभर आहे. पर्यावरणासह भारतीय राजकारणाचा बारकाईने अभ्यास करून त्याचे विश्लेषण करण्याची हातोटीही त्यांच्याकडे असल्याने, राजकीय विश्लेषक म्हणून जनमानसात त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. (प्रतिनिधी)