लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : हारतुरे यांना फाटा देत विविध सामाजिक उपक्रमांनी शुक्रवारी काँग्रेसचे युवा नेते, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कोरोनासदृश परिस्थितीमध्ये वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय विशाल पाटील यांनी घेतला होता. कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा केला. खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आली. यावेळी अखिल गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन दिलीप गुरव, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. महेश जाधव, अखिल महाराष्ट्र घडशी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळुंखे, दवाखान्याचा सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीत फळवाटप करण्यात आले. सांगली येथील सावली बेघर निवारा केंद्र आणि वेलणकर अनाथाश्रम येथे फळे आणि खाऊवाटप करण्यात आले.
मिरज येथील माहेर, विश्वदीप अनाथआश्रमामध्ये लहान मुलांना फळे व खाऊवाटप करण्यात आले. तसेच सांगली बेघर वसाहत येथे २०० लोकांना रमेश ताटे मित्रपरिवाराच्यावतीने जेवण देण्यात आले तसेच टाकळी बोलवाड येथे वृक्षारोपण झाले.
यावेळी मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, उपमहापौर उमेश पाटील, वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, वसंतदादा कारखान्याचे संचालक अमित पाटील, सुरेश राजाराम पाटील, काँग्रेसचे युवा नेते हर्षवर्धन प्रतीक पाटील, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, विशालदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडूतात्या पाटील, रमेश ताटे, सांगली काँग्रेस नेते महेश साळुंखे, अशोक मासाळे, मिरजचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी, संजय कुलकर्णी, राजेश एडके, रोहन एडके, उदय कदम, गणेश घोरपडे, सुरज सकट, विशालदादा युवा प्रतिष्ठान मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष श्रीमंत पांढरे, सोशल मीडिया अध्यक्ष मकरंद चिखले, उपाध्यक्ष महावीर खोत, कपिल कबाडगे, उपाध्यक्ष सुनील सुरेश पाटील, संभाजी लोखंडे, कांचन पाटील, तेजस धुळूबुळू, भाऊसाहेब नरगच्चे, आण्णासाहेब नरगच्चे, तारिक नायकवडी, सुनील खोत, वसीम रोहीले, आमगोंडा पाटील, ईराप्पा नाईक, धनराज सातपुते, महादेव गुरव, सुनील गुळवणे, सुहास पाटील, विनायक कोळेकर, सुधीर कांबळे, विशाल निकम, हरी हत्तीकर, महेश स्वामी, विवेक पाटील, नितीन खोत, रवींद्र खराडे, प्रशांत अवधूत, विजय चव्हाण, राहुल काशीद, विनायक मस्कर, हुसेन मुजावर, रोहित नाईकुडे, बाळासाहेब चव्हाण, उदय बरगाले, सुलेमान मुजावर, रमेश सुबराव पाटील, योगेश आबा जाधव, महेश चिखले, जमीर पटाईत, अमोल आदगौंडा पाटील, श्रीनाथ देवकर, किरण खोत, विश्वजित काळे आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.