कडेगाव : तडसर (ता. कडेगांव) येथील विराज चंद्रकात पवार यांची कडेगांव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात निवडीचे पत्र जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड यांच्या हस्ते पवार यांना देण्यात आले.
यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक, कडेगांव तालुकाध्यक्ष जयदीप (काका) यादव, जिल्हा चिटणीस जगदीश महाडिक, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वत्रे, आदी उपस्थित होते.
फोटो : ०१ कडेगाव १
ओळ : कडेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवडीचे पत्र शरद लाड यांनी विराज पवार यांना दिले. यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील, अविनाश पाटील उपस्थित हाेते.