शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारप्रकरणी भोंदूस १२ वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:11 IST

सांगली : करणी काढण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ...

सांगली : करणी काढण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अब्दुलराही मुसा शेख (वय ३६, रा. बीड) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पीडित मुलीला मिरजेतून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. मिरज पोलिसांनी पीडित मुलीसह आरोपीस अलाहाबाद रेल्वेस्थानकावर पकडले होते.खटल्याबाबतची माहिती अशी, आॅगस्ट २०१३ मध्ये हा प्रकार घडला होता. फिर्यादी मिरज येथील रहिवासी असून, त्याचा पत्नी व कुटुंबातील व्यक्तींशी वारंवार वाद होत असे. हे वादावादीचे प्रकार त्याने तडसर येथील नातेवाईकास सांगितले होते. त्यावर, तुझ्या बायकोवर कोणी तरी करणी केली असणार, त्यामुळे ती अशी वागत आहे. त्यावर उपाय केल्यास ती व्यवस्थित वागेल, असे नातेवाईकाने सांगितले. त्याच्या संपर्कातील आरोपी शेख हा करणी काढण्याचे काम करतो, असे सांगून, त्याला बोलावून घेतले होते.यावेळी फिर्यादीची भाची सुटीसाठी आलेली होती. आरोपी शेख याने पीडित मुलीसही करणी बाधा झाल्याचे सांगून, ती काढली पाहिजे असे सांगितले. १८ आॅगस्ट २०१३ रोजी तो मिरज येथे आला होता. यावेळी आरोपी शेख याने फिर्यादीच्या कुटुंबातील सर्वांना एका खोलीत बसवून, मी बोलाविल्याशिवाय बाहेर येऊ नका, असे सांगितले. मात्र, बराचवेळ झाला तरी त्याने बोलावले नाही. त्यामुळे संशय आल्याने आत जाऊन पाहिले असता, आरोपी शेख व पीडित मुलगी घरात नसल्याचे दिसून आले. त्यांचा शोध घेतला असता, ते मिळून न आल्याने आरोपी शेखविरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती.दरम्यानच्या कालावधित शेखने या मुलीला पुणे व तेथून औरंगाबाद येथील नातेवाईकाकडे नेऊन तिथे त्याने मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीला घेऊन तो मनमाड व अलाहाबाद येथून दरभंगाला जात असताना मिरज पोलिसांनी त्यास मुलीसह ताब्यात घेतले होते. मुलीने, आपणास पळवून नेऊन अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले.सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदारया गुन्ह्याचा तपास करून आरोपी शेखविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले व साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्रन्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले.