शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर गटातील गावे लेंगरेला जोडली

By admin | Updated: September 10, 2016 00:40 IST

जिल्हा परिषदेचे तीन गट : पंचायत समितीचे सहा गण, प्रारूप रचना, १० आॅक्टोबरला अंतिम घोषणा

विटा : खानापूर तालुक्याची जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रारूप रचना तयार करण्यात आली असून हरकती व सूचनांची मुदत संपल्यानंतर दि. १० आॅक्टोबरला अंतिम रचना जाहीर होणार आहे. तालुक्यात यावेळी एक जिल्हा परिषद गट रद्द करण्यात आला असल्याने पंचायत समितीसाठी सहा गण राहणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गटात २०११ च्या जनगणनेनुसार ३८ हजार ५०० पर्यंतची लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. खानापूर शहर नगरपंचायत जाहीर झाल्याने त्या गटातील गावे लेंगरे जिल्हा परिषद गटाला जोडण्यात आली आहेत.खानापूर तालुक्यात यापूर्वी चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समितीचे गण होते. खानापूर नगरपंचायत झाल्याने हे गाव त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे खानापूर पूर्व भागातील करंजे व बाणूरगडपर्यंतची गावे लेंगरे जिल्हा परिषद गटाला जोडण्यात आली आहेत. नागेवाडी, लेंगरे व भाळवणी हे तीन जिल्हा परिषद गट आणि गार्डी, नागेवाडी, लेंगरे, करंजे व भाळवणी, पारे हे सहा पंचायत समिती गण तयार करण्यात आले आहेत. नागेवाडी जिल्हा परिषद गटात ३८ हजार ७५९, लेंगरे जिल्हा परिषद गटात ३८ हजार १६५ व भाळवणी जिल्हा परिषद गटात ३८ हजार ५४४ लोकसंख्या समाविष्ट करण्यात आली आहे. गार्डी पंचायत समिती गणात ११, नागेवाडी पंचायत समिती गणात ९, लेंगरे पंचायत समिती गणात १२, करंजे पंचायत समिती गणात १४, भाळवणी पंचायत समिती गणात ८ व पारे पंचायत समिती गणात १० गावांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन प्रारूप गट व गणांच्या रचनेनुसार अनेक गावांनी जुना गट व गण सोडून सोयीनुसार नव्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ असे वातावरण दिसून येत आहे.दरम्यान, विटा तहसील प्रशासनाच्या निवडणूक शाखेने खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी नवीन प्रारूप रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. ही नवीन संभाव्य प्रारूप रचना आयुक्त कार्यालयाकडे पाठविल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतरच दि. १० आॅक्टोबरला ही नवीन प्रारूप रचना अंतिमरित्या जाहीर होणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)