शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वड्डीत गावकऱ्यांनी बंधाऱ्यांचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

मिरज : वड्डी (ता. मिरज) येथील ओढ्यावरील बंधाऱ्याचे बांधकाम गावकऱ्यांनी बंद पडले. गावात ग्रामस्थ व ग्रामपंचायत असे दोन गट ...

मिरज : वड्डी (ता. मिरज) येथील ओढ्यावरील बंधाऱ्याचे बांधकाम गावकऱ्यांनी बंद पडले. गावात ग्रामस्थ व ग्रामपंचायत असे दोन गट पडले आहेत. बांधकाम सुरू झाल्यास पाण्यात सामूहिक उड्या मारून आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मिरजेत कृष्णा नदीला मिळणाऱ्या वड्डीच्या ओढ्यावर बंधारा बांधण्याचे काम सुरू होते. महापुराच्या भीतीने वड्डीच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन बंधाऱ्याचे काम बंद पाडले आहे. २०१९ मध्ये आलेल्या कृष्णा नदीच्या महापुराने वड्डी गाव बाधित झाले होते. वड्डी ओढ्यालगत असलेल्या मागासवर्गीय वस्तीत पुराचे पाणी शिरले होते. त्याच्याशेजारी बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. या ५५ मीटरचा बंधाऱ्याच्या कामासाठी ४९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या बंधाऱ्याची ४७.७२ टी. सी. एम. पाणीसाठा क्षमता आहे. पूर आला तर वड्डी ओढ्यातील बंधाऱ्याच्या पाण्याचा साठा व कृष्णा नदीच्या पुराचे पाणी मिळून वड्डी गाव पुरात बुडेल ही भीती ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे. गुरुवारी ग्रामस्थांनी एकत्र येऊन बंधाऱ्याचे बांधकाम बंद पडले. पंचायत समितीचे प्रभारी सभापती अनिल अमटवणे यांनी उपविभागीय जलसंधारण अधिकारी शिवाजी गोसावी व त्यांच्या अभियंत्यांना बोलावून घेतले होते. प्रत्यक्ष बंधाऱ्याच्या बांधकामाच्या ठिकाणी अधिकारी, ग्रामस्थ जमले होते. ग्रामस्थांना बंधारा नको तर बांधकाम बंद करा, असे म्हणत प्रभारी सभापती अनिल अमटवणे यांनी ग्रामस्थांची बाजू मांडली.

यावेळी बंधाऱ्यालगत उर्दू शाळा आहे. त्यालाही याचा फटका बसणार असल्याने शाळेतील मुले, पालक, ग्रामस्थ यांनी बंधारा नको असे फलक हातांत घेऊन घोषणा दिल्या. आता ग्रामस्थांनी टोकाची भूमिका घेतल्याने बांधकाम सुरू केल्यास पाण्यात सामूहिक उड्या मारून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. वड्डी सत्ताधारी ग्रामपंचायत गटाने बंधाऱ्याची मागणी केली होती. त्याला ग्रामस्थांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. त्यामुळे गावात दोन गट पडले आहेत. सभापती अनिल अमटवणे यांनी वड्डीच्या गावकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.