शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

देवराष्ट्रेत साकारतंय ग्रामीण पर्यटन केंद्र

By admin | Updated: July 17, 2014 23:41 IST

कोट्यवधीचा निधी : यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघराचे पर्यटकांना आकर्षण

प्रताप महाडिक - कडेगावअनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या देवराष्ट्रे गावाकडे यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने राज्य शासनाची नजर गेली. केवळ नजरच नाही, तर मेहेरनजर गेली. मेहरबान शासनाने गावावर निधीची न भुतो... अशी खैरात केली. यातून देवराष्ट्रे गावात साकारतेय एक ग्रामीण पर्यटन केंद्र. हे गाव आदर्श गाव साकारण्याचा शासनाचा मनोदय आहे.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी शासनाने दिला. मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता आणि आदर्श गाव संकल्पना यामुळे स्थानिक नेत्यांनीही राजकारण बाजूला ठेवून सुरुवातीपासून विकासकामांना साथ दिली. परंतु, तसजशी कामे होत गेली, तशा काही कामांबाबत तक्रारी झाल्या. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा इशारा दिल्यावर, काही ठेकेदारांनी निकृष्ट झालेली कामे दुरूस्त करून घेतली. अशा काही उणिवा वगळता देवराष्ट्रे आदर्श गाव संकल्पनेतून एक ग्रामीण पर्यटन केंद्र होण्याच्यादृष्टीने वाटचाल करीत आहे.देवराष्ट्रे येथील विकास कामांसाठी यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निधीतून ८ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी मिळाला. जिल्हा नियोजनमधून २ कोटी, तर राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ६१ लाख असा १२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी देवराष्ट्रे गावासाठी मिळाला. यातून पिण्याच्या पाण्याची राष्ट्रीय पेयजल योजना, गावातील अंतर्गत रस्ते, ग्रंथालय, शाळा इमारत दुरूस्ती व कंपाऊंड, गावाला जोडणारे मुख्य रस्ते अशी विविध विकासकामे झाली आहेत. शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जन्मघर स्मारकाचा निधी जागेअभावी अद्याप पडून आहे.देवराष्ट्रेतील शाळा संगणकीकृत झाली आहे. अद्ययावत ग्रंथालय साकारले आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू होणार आहे. एकंदरीत यशवंतमय झालेले देवराष्ट्रे लवकरच ग्रामीण पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.