शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तूल, काडतुसे जप्त

By admin | Updated: March 8, 2016 00:53 IST

विटा पोलिसांची कारवाई : तासगावच्या माजी सैनिकासह तिघांना अटक

विटा : विनापरवाना अवैध गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे बाळगून त्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विलास आनंदा मदने (वय ३४, रा. बोरगाव, ता. तासगाव) याच्यासह त्याचा मित्र विजय वसंत पवार (२९, रा. सुभाषनगर, लांडगोळ मळा, तासगाव) व भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक मोहन वसंतराव पाटील (५६, रा. वरचे गल्ली, तासगाव) या तिघांना विटा पोलिसांनी अटक केली. मुख्य संशयित विलास मदने याच्याकडून पोलिसांनी ३० हजार रूपये किमतीचे गावठी पिस्तूल, ३०० रूपये किमतीची सहा जिवंत काडतुसे व ५० हजार रूपये किमतीची दुचाकी असा एकूण ८० हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विटा-तासगाव रस्त्यावरील एसार पेट्रोल पंपाजवळ विटा पोलिसांनी ही कारवाई केली.बोरगाव येथील विलास मदने हा विट्यात गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र भिंगारदेवे, सुनील पाटील, सुहास खुबीकर, उत्तम माळी, विशाल चंद, विलास मुंढे आदींनी रविवारी रात्री एसार पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला. त्यावेळी मोटारसायकलवरून (क्र. एमएच १०-बीई-२५४) संशयित विलास मदने हा पेट्रोल पंपाजवळ आला. त्यावेळी पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला छोट्या कापडी पिशवीत काळ्या व सोनेरी रंगाचे मॅग्झीन असलेले गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन पिस्तूल व काडतुसे जप्त केली.या प्रकरणातील संशयित विलास मदने, विजय पवार व माजी सैनिक मोहन पाटील या तिघांना अटक करून सोमवारी दुपारी विटा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना दि. ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलीस निरीक्षक ए. व्ही. चव्हाण पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)मित्राची ठेव...विटा येथे केलेल्या कारवाईनंतर संशयित मदने यास विटा पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने, हे पिस्तूल आपला मित्र विजय वसंत पवार याने आपल्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. तसेच विजय पवार याने हे पिस्तूल त्याच्या ओळखीचा भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक मोहन वसंतराव पाटील याच्याकडून विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.