शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कविसंमेलनात विषमतेवर प्रहार, विटा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : नवोदित कवींच्या ज्वलंत प्रश्नावर कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:49 IST

विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते?

विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते? मूल्यास गाढणारे ते लोक कोण होते? असे विविध सवाल करीत विटा (जि. सांगली) येथील कविसंमेलनात प्रसिध्द गजलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी, कोरेगाव-भीमा प्रकरणामुळे निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेवर भाष्य करीत प्रहार केला.विटा येथे रविवारी भारतमाता ज्ञानपीठ साहित्य सेवा मंडळ व मुक्तांगण वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या ३६ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सांगोलेकर बोलत होते.

कविसंमेलनाचे सरस्वतीपूजन कविता चव्हाण व बाळकृष्ण चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. मोहनराव कदम, माधुरी कदम, सुधीर कुलकर्णी, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी, डॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर उपस्थित होते.

कविसंमेलनात सुमंत सगरे, राजाजी महाराज, अशोक ताटपुजे, साक्षी जाधव, शंकर कांबळे, शकुंतला होनमाने, संदीप शितोळे, नीता वीर, डॉ. प्रकाश जाधव, स्वाती शिंदे-पवार, बबुताई गावडे, हर्षवर्धन मेटकरी, प्रभाकर पाटील, वृषाली कुलकर्णी, दीपाली घाडगे, गौरी बागलकोटे, पृथ्वीराज भिंगारदेवे, सुभद्रा गायकवाड, सुवर्णा माळी, शबाना मुल्ला, नीशा वायदंडे, संजय नायकवडी, भीमराव कुंभार, नितीन गवळी, अनिल तावरे, अल्ताफ हुसेन मुजावर, शारदा कदम, विठ्ठल भागवत, अशोक पवार, शिवाजी जाधव, सुधाकर महामुनी, वीर राहुल, चंद्रकांत बल्लाळ, चंद्रवर्धन लांडगे, चंद्रकांत कान्हेरे, अमर गंगथडे, नवनाथ आडे, कृष्णा काळे, प्रा. दिनकर जगदाळे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, अर्चना लाड, शाहीर पाटील, बाबूराव शेळके, दयासागर बन्ने, नामदेव भोसले, गौतम कांबळे, डॉ. अंजली रसाळ, देविका दिवटे, प्राची मेटकरी, दादा सावंत या कवींनी कविता सादर केल्या. त्यांच्या कविताना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

योगेश्वर मेटकरी यांनी प्रास्ताविक, तर रघुराज मेटकरी यांनी स्वागत केले. डॉ. ऋषिकेश मेटकरी यांनी आभार मानले.सामाजिक : विषयभारतमाता ज्ञानपीठ साहित्य सेवा मंडळ व मुक्तांगण वाचनालयाच्यावतीने आयोजित या कविसंमेलनात विविध निमंत्रित कवींनी स्त्री-भूणहत्या, राष्टÑीय एकात्मता, राजकारण, महागाई, आरक्षण, जातीय तंटे यासारख्या अनेक सामाजिक विषयांना स्पर्श करणाºया कविता सादर केल्या. याला उपस्थित श्रोत्यांकडून चांगलीच दाद मिळाली.विटा येथे रविवारी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रसिध्द गजलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कवयित्री सौ. स्वाती शिंदे-पवार, कवी सुधीर इनामदार, योगेश्वर मेटकरी उपस्थित होते.