शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बलवडीत २५ ला ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

By admin | Updated: December 16, 2014 23:38 IST

सतीश लोखंडे : अध्यक्षपदी आ.ह.साळुंखे

विटा : खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ व मारूती नाना पवार सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यमाने बलवडी (भा.) येथे दि. २५ डिसेंबर रोजी २३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश चव्हाण व सतीश लोखंडे यांनी दिली. हे संमेलन चार सत्रात होणार असून उद्घाटन इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह प्रा. शामराव पाटील यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांचे मनोगत होणार असून, मान्यवरांच्याहस्ते संपतराव पवार, व्ही. वाय. पाटील व नथुराम पवार यांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ग्रामीण साहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार असून, यात प्रा. बाबूराव गुरव, प्रसिध्द कादंबरीकार आनंद विंगकर व नागपूरचे जयदीप हार्डीकर सहभागी होणार आहेत.तिसऱ्या सत्रात इस्लामपूरच्या कवयित्री सौ. नंदिनी साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होत असून, चौथ्या सत्रात ‘मी कात टाकली’ या प्रसिध्द कादंबरीचे लेखक व वाटंबरे येथील कथाकार जोतिराम फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे. या कथाकथन कार्यक्रमात प्रा. शांतिनाथ मांगले, एम. बी. जमादार यांच्यासह कथालेखक सहभागी होणार असल्याचेही सुरेश चव्हाण व सतीश लोखंडे यांनी सांगितले. (वार्ताहर)