लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी प्रा. विजयकुमार जोखे (शिराळा), जिल्हा प्रधान सचिव म्हणून शंकर शेलार आणि नीलेश कुडाळकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली.
कार्याध्यक्ष अजय भालकर, उपाध्यक्ष ॲड. के. डी. शिंदे (सांगली), प्रधान सचिव नीलेश कुडाळकर (इस्लामपूर), शंकर शेलार (सांगली), बुवाबाजीविरुद्ध संघर्ष कार्यवाह प्रा. अर्जुन कर्पे (कवठेमहांकाळ), विविध उपक्रम विभाग कार्यवाह वनिता बनसोडे (इस्लामपूर), वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग खंडू घोडे (संख), महिला सहभाग विभाग कार्यवाह प्रा. डॉ. तृप्ती थोरात (इस्लामपूर), युवा कार्यवाह सुधीर शिवाजी दाभाडे (शिराळा), सहकार्यवाह शशिकांत दादा कांबळे (शिराळा), जाती अंतसंकल्प कार्यवाह प्रा. राम घुले (इस्लामपूर), सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह दीपक सदाशिव खरात (आटपाडी), कायदेविषयक व्यवस्थापन ॲड. भारत शिंदे (सांगली), सोशल मीडिया प्रा. प्रकाश यशवंत बुरटे (बोरगाव), सहकार्यवाह प्रचित शहा (इस्लामपूर), प्रकाशन विभाग कार्यवाह डॉ. सुनील पाटील (पाडळी), प्रशिक्षण विभाग - शुभांगी शिरसे (सांगली) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
सांगली जिल्ह्यात महाअंनिसचे काम वाढविणे, शाखा विस्तार करण्याचे ठरले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. नितीन शिंदे, प्रा. प्रमोद गंगनमाले, प्रा. एल. डी. पाटील, एम. डी. जाधव, प्रा. बी. आर. जाधव उपस्थित होते.